
आज पर्यंत आपण खूप सारा घोटाळ्याबद्दल ऐकल असेल परंतु पालघर जिल्ह्यातील अस्तित्वात असणाऱ्या वसई विरार महानगरपालीकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी स्मशान घोटाळा केला आहे.
या घोटाळ्यांमध्ये पालिकेने महानगरपालिकेने जनतेच्या अकरा (11) करोड रुपयांचा चुराडा केला आहे. यासंदर्भात दोषींवर कारवाई करण्यासाठी *एडवोकेट वर्मा* व *एडवोकेट अनिल चव्हाण* गेल्या (11) अकरा दिवसांपासून अप्पर पोलीस अधीक्षक पालघर त्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. परंतु माणिकपूर पोलीस स्टेशन-वसई FIR घेण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे.
आज वकीलना FIR करण्यासाठी अकरा दिवस उपोषण करावे लागत असेल तर सामान्य जनतेचे काय ???
वसई तालुक्यातील जनतेच्या हक्कासाठी चाललेल्या या लढ्यात *परिवर्तन लढा* नेहमी त्यांच्या सोबत असेल.
जोपर्यंत जनतेच्या अकरा करोड खाल्लेल्या संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी तसेच ठेकेदार व नगरसेवक यांच्या विरोधात फिर्याद दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.
