

प्रतिनिधी : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला मिळणारा प्रतिसाद आणखी वाढवण्यासाठी आणि गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी “स्वच्छता हीच सेवा” या अभियानाची सुरवात केली. स्वच्छता मोहिमेला मिळणारा प्रतिसाद वाढवणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाच्या ४थ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वसई-विरार शहर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान स्थापित यशोधरा वस्तीस्थर संघ, बोळींज यांचे विद्यमाने बुधवार दिनांक २ आॅक्टोबर रोजी बोळींज येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यशोधरा वस्ती स्थर संघाच्या महिलांनी सभोवतालचा परीसर स्वच्छ केला व स्वच्छतेबाबत लोकांना जागृत केले. स्वच्छता अभियाना नंतर प्रत्येकाच्या घरोघरी भेटी देऊन प्लास्टीक निर्मुलन जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत प्लास्टीक गोळा केले व प्लास्टीक पिशव्या व साहित्य वापरू नये याबाबत लोकांना सांगितले. त्यानंतर महिलांनी जनजागृती रॅली काढून कार्यक्रमाची सांगता करण्यातआली. बचत गटाच्या व परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमास उत्स्फुर्त सहभाग दर्शविला व महिलाचे कौतुक केले. दिनांक ५ आॅक्टोबर रोजी यश किर्ती हायस्कूल, नालासोपारा यांचे संयुक्त विद्यमाने स्वच्छता जनजागृती व प्लास्टीक निर्मुलन रॅली काढण्यात आली होती. रॅलीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यानी व शिक्षकांनी स्वच्छता जनजागृती व प्लास्टीक निर्मुलन चे फलक घेऊन सहभाग घेतला. रॅलीनंतर शाळेच्या आवारात पोषण आहार मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात करताना आयु. निलम जाधव यांनी पोषण योजना प्रभावीपणे राबविणेबाबत अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. त्यामध्ये त्यांनी पोषण आहाराचे महत्व व उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या डाॅ. प्रतिक्षा पाटील यांनी समतोल आहाराबाबत सविस्तर विवेचन केले. व शाळेच्या संचालिका मा. संचिता मुलतानी यांनी मुलांशी व पालकांशी संवाद साधला. कार्यक्रमास मा. दत्ता धुळे उपस्थित होते. पोषण योजना कार्यक्रमावेळी विद्यार्थ्याना खजुर, चिक्की, पुरणपोळी, शेंगदाणे, इत्यादींचे यांचे वाटप करण्यात आले. दिनांक ६ आॅक्टोबर रोजी वस्ती संघाच्या महिला सदस्यांद्वारे राजोडी समुद्र किनार्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पंतप्रधानांनी सर्वांना या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ भारत निर्माण करण्यात आपला सहभाग देण्याचे आवाहन केले होते. व खासगी क्षेत्राकडून स्वच्छता मोहिमेत भरीव कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली होती. सदर आवाहनाला प्रतिसाद देत यशोधरा वस्ती स्थर संघाने राबविलेल्या उपक्रमांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.