
“
केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानांतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण २०२२” चा निकाल ०२ ऑक्टोबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. सदर सर्वेक्षणात ४००० पेक्षा जास्त शहरांनी भाग घेतलेला होता. देशात दशलक्ष पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी वसई विरार शहर महानगरपालिकेस “स्वच्छ सर्वेक्षण २०२२” मध्ये देशात २५ वा व राज्यात ७ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच शहरास ODF++ मानांकन देखील प्राप्त झालेले आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ मध्ये वसई विरार शहर २९ व्या क्रमांकावर होते.