पालघर दि 14. :. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ”पालघर पोलीस दला मार्फत १० कि.मी. अमृतमहोत्सवी दौडचे आयोजन करण्यात आले होते.
.
. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर पोलीस दलातर्फे सकाळी 6 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, मोरेकुरण रोड, जिल्हा मुख्यालय, कोळगाव, पालघर येथून १० कि.मी. “अमृतमहोत्सवी दौडचे” आयोजन करण्यात आले होते. अमृतमहोत्सवी दौडमध्ये जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, .पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिह अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपजिल्हाधिकारी(सा. प्र)संजीव जाधवर तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सदरची दौड ही पोलीस अधीक्षक कार्यालय येथून चाररस्ता ते पालघर रेल्वे स्टेशन ते माहिम वळण नाका व परत चाररस्ता मार्गे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे समाप्त करण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये शासकीय अधिकारी व अंमलदार, शाळेतील विद्यार्थी, एन.सी.सी. विद्यार्थी, नागरीक असे एकूण ७०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.

सदर १० कि.मी. दौडमध्ये विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे . प्रथम 3 आलेले सर्वसाधारण पुरुष गटात
अभिषेक चंद्रकांत पागधरे, रा. शिरगाव,
सचिन रामा गोविंद, रा. विक्रमगड,
उमेशसिंह नरसिंह राजपुत, रा. शिरगाव,
प्रथम ३ आलेल्या सर्वसाधारण गटात
रोहिणी माया पाटील, रा. विरार,
अर्चना नरेश खुताडे, रा. पालघर,
मोनाली माळी रा. विक्रमगड, प्रथम ३ आलेले शासकीय पुरुष गटात :
पोशि/ १४७० परेश सुरजितसिंह मेस्त्री नेम. घोलवड पोलीस ठाणे
पोशि/ ३६ पंकज रडका कानल पोलीस मुख्यालय,
पोशि/ ११७८ सचिन दबडे, पोलीस मुख्यालय
प्रथम ३ आलेल्या शासकीय महिला गटात :
रिंकी महंती, होमगार्ड
मपोशि/ २५०४ ज्योती जाधव, जिल्हा विशेष शाखा,
मपोउपनि / पुनम सुर्यवंशी, जव्हार पोलीस ठाणे,
१२ वर्षाखालील प्रथम ३ आलेल्या शालेय विध्यार्थी गटात :
सुशांत श्रीमंत सांगळे, आनंदाश्रम विद्यालय पालघर,
शार्वी उपेंद्र मोरे, आनंदाश्रम विद्यालय पालघर, श्रव्या मंगेश मोहिते, आनंदाश्रम विद्यालय पालघर
. .जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिंह , अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सा प्र ) संजीव जाधवर यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी व अंमलदार तसेच नागरीक यांनी सहभाग घेऊन १० कि. मीची .दौड यशस्वीपणे पुर्ण केली. तसेच वरील मान्यवरांच्या शुभहस्ते विजयी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *