

वसई(प्रतिनिधी):- ३१ मे २०२० रोजी सागरशेत पेट्रोल पंप,वसई येथे गटार दुरुस्तीचे काम व.वि.श. महानगरपालिका प्रभाग समिती आय ने सूचित केलेल्या ठेकेदार मे. श्रेयस इंटरप्राइसेस,विरार(श्री योगेश जोशी) यांनी सुरू केले होते… जे अद्यापही चालू आहे सदर काम हे वॉर्ड क्रमांक ११० मधील सागर शेत पेट्रोल पंप जवळ आर. सी. सी. क्रॉसिंग उघाडी ही आर. सी. सी. बॉक्स कल्वर्ट बांधण्याचे काम अंदाजित रक्कम १२, ५८,३७४/- रुपये व.वि.श.महानगरपालिका प्रभाग समिती आय ने मंजूर केलेले आहे. परंतु महानगरपालिका ठेकेदार खूप व कंत्राटदार यांनी हे काम एक तर उन्हाळ्यात लोक डाऊन मध्ये किंवा पावसाळ्यानंतर सुरू करायला हवे होते परंतु यांना या लवकर पडणाऱ्या पावसाचा किंवा इथेच हाकेच्या अंतरावर असलेल्या जीजी कॉलेज येथील कोविड १९ सेंटरचा विसर पडला असावा अथवा त्यांना येणाऱ्या परिस्थितीचं गांभीर्य नसावे म्हणून त्यांनी हे गटार दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. तसेच सदर काम सुरू करण्यापूर्वी महानगरपालिकेने ठेकेदाराने आणि कंत्राटदाराने याबाबत आधी कोणतीही पूर्वकल्पना न देता रस्ता खोदण्यात सुरू केले होते व त्यात अपघात होण्याची पूर्ण शक्यता होती..ह्यासाठी युवाशक्ती एक्सप्रेस मध्ये सर्व प्रथम ही बातमी छापून आली होती तसेच सदर कामाचे वर्क ऑर्डर बांधकाम विभागाचे श्री साटम साहेब यांच्याकडे मागितली होती परंतु ती वर्क ऑर्डर देण्यास टाळाटाळ करण्यात आली.. आणि हा सागर शेत येथील मार्ग मुख्य रहदारीचा असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. अशावेळी या ठेकेदारांनी रस्ता बंद असण्याचे व पर्यायी रस्ता वापरण्याचे सूचना फलक लावणे अनिवार्य आहे. आणि या सूचनांची ठेकेदारांनी अंमलबजावणी न केल्यामुळेच आज सकाळी एका चार चाकी वाहनाचा या गटारात पडून अपघात झाला, आणि या सदर घटनेला महानगरपालिका प्रभाग समिती आय व ठेकेदार जबाबदार आहेत. तसेच या ठेकेदारांनी महानगरपालिका प्रभाग समिती आय च्या मेहेरबानीने नागरिकांना गृहीत न धरता आपला मनमानी कारभार सुरू केला आहे. कारण सध्याची कोविड १९ रुग्णांची वाढती संख्या व परिस्थिती पाहता सागर शेत पेट्रोल पंप येथून हाकेच्या अंतरावर असलेले पारनाका येथील सर डी एम पेटिट सरकारी रुग्णालय व जीजी कॉलेज येथील कोविड सेंटर येथे रुग्णांची अथवा मृतकांची ने आण करणारी रुग्णवाहिका किंवा युद्धजन्य परिस्थितीत अत्यावश्यक सुविधा पुरविणारी अग्निशामक दलाचे वाहन यांची अतिशय कोंडी होत आहे वाहतुकीस आजूबाजूने पर्यायी रस्त्याने जाण्याचा प्रयत्न केले असता अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे आणि अशावेळी जर एखादी पुन्हा दुर्घटना झाली तर त्यास महानगरपालिका प्रभाग समिती आय च्या बांधकाम विभागाचे श्री. साटम साहेब व ठेकेदार श्री योगेश जोशी जबाबदार असतील..?? असा सवाल येथील नागरिक करत आहेत..
