निवृत्ती वेतन धारकांसाठी प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर मध्ये जीवन प्रमाण पत्र / हयातीचा दाखला / Life Certificate देणे क्रमप्राप्त आहे. भारतात असे निवृत्ती वेतनधारक कोट्यवधी आहेत. आता पर्यंत ह्या निवृत्ती वेतन धारकांना त्याच्या बँकेत / पोस्ट ऑफिस मध्ये प्रत्यक्ष जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने आपण जिवंत असल्याचा पुरावा ( हयातीच्चा दाखला ) द्यावा लागत होता.
ह्या वर्षी शासनाने ह्या करीता कॉम्पुटर साठी व मोबाईल साठी ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. संपूर्ण भारतातील सगळ्या संस्थांची नोंदणी त्यात असून कोणत्याही निवृत्ती वेतन धारकाला आधारकार्ड नंबरवर आधारीत ऑनलाइन पद्धतीने हा हयातीचा दाखला देता येतो. ह्या मध्ये बायोमेट्रिक सेन्सर वर हाताची बोटे किंवा डोळ्याचे बुबुळ स्कॅन करून हा दाखला देता येतो. ह्या करिता आधारकार्ड क्रमांक, निवृत्ती वेतन ऑर्डर ( PPO) क्रमांक, निवृत्ती वेतन देणारी संस्था व बँकेचा अकाउंट नंबर लागतो. पण आता अद्यावत केलेल्या ह्या प्रणाली मध्ये आधार कार्ड क्रमांक टाकल्यावर बाकीची सगळी माहिती प्रदर्शित केली जाते. ह्या प्रणालीत देत असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येतो व लगेच आपला जीवन प्रमाण क्रमांक मोबाईल वर येतो व जीवन प्रमाण पत्र तयार करण्यासाठी लिंकही येते. ह्या लिंकद्वारे लगेच आपले जीवन प्रमाण पत्र तयार होते व त्याची पीडिफ ( PDF ) प्रत आपल्याला मिळते.
निवृत्ती वेतनधारकांची संख्या मोठी असल्याने व काही ठराविक बँका व पोस्ट ऑफिस मध्येच ही सुविधा असल्याने तिथे फार गर्दी होते व वेळही जातो. हालचाल न करता येणाऱ्यांना प्रत्यक्ष बँक किंवा पोस्ट ऑफिस कर्मचारी घरी येऊन हे करावे लागते. काही बँकांनी व्हिडिओ कॉलद्वारे घरी बसून हा दाखला देता येईल अशी घोषणा केली असली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
हे सगळे पाहता निवृत्ती वेतन धारकांसाठी घरपोच सशुल्क सेवा देण्याची सुविधा उमेळे( वसई) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप अनंत राऊत ह्यांनी उपलब्ध करून दिली आहे. आपल्या घरी येऊन बायोमेट्रिक पद्धतीने आपल्या हयातीच्या दाखला आपल्या संस्थेला देता येतो . तसेच आपल्याला ह्या दाखल्याची पीडिफ किंवा फोटो प्रत ( PDF / JPEG ) आपल्या मोबाईलवर दिली जाईल. वसई परिसरासाठी रु. ७०/- ( रुपये सत्तर फक्त ) आकारले जाईल व वसई बाहेर प्रवास खर्च द्यावा लागेल असे श्री दिलीप अनंत राऊत ह्यांनी कळविले आहे . जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा.
संपर्क ; श्री दिलीप अनंत राऊत
9325267933
हयातीच्या दाखल्यासाठी घरपोच सेवा