
वसई व नालासोपारा विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे.प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार मैदानात उतरवले आहेत.बविआ,सेना व मनसे असे तीन प्रमुख राजकीय पक्ष एकमेकासमोर उभे ठाकले आहेत.या दोन्ही जागी अपक्षांची रेलचेल असून उद्या अर्ज माघार घेण्याच्या दिवशी या लढती दुरंगी,तिरंगी कि चौरंगी,हे स्पष्ट होणार आहे.एक मात्र खरे की बविआ विरोधात सेना,अशीच लढत होण्याची शक्यता आहे.मनसेने उमेदवार उतरवले असले तरी त्यांचा प्रभाव तितकासा जाणवणार नाही.
या दोन्ही मतदारसंघातील मतदार,आपल्या मतदारसंघातील लढती,या विकासाच्या प्रश्नावर झाल्या पाहिजेत,यासाठी आग्रही आहेत.पण तसे होणार नाही कारण विरोधकांकडे परिसर विकासावर बोलण्यासारखे काहीच नाही.नसलेला दहशतवाद,व्यक्तिद्वेष आणि रस्त्यावरील खड्डे इ.तकलादू विषयावर विरोधकांनी आजवर भर दिला,यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.तालुक्यातील चार शहराची वाढती लोकसंख्या,त्या अनुषंगाने नागरी सुविधासंदर्भात निर्माण होणाऱ्या समस्या, लोकांच्या वाढत्या गरजा,ग्रामीण भागातील लोकांचे जीवन अधिक सुसह्य कसे होईल,यासाठी अभ्यास करणे,या महत्वाच्या विषयाकडे विरोधकांनी आजवर कधीही लक्ष दिले नाही.त्यांच्या व्यक्तिद्वेषाचे राजकारण केवळ आ.हितेंद्र ठाकूर यांच्या अवती-भवती फिरत राहिले.आपल्याला काय करायला हवे? याचे भान त्यांना कधीही राहिले नाही,पुढेही ते होईल,याची सुतराम शक्यता नाही.दुसरीकडे आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितिज ठाकूर यांनी मात्र विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागाला न्याय देण्याचा कसोशीने व प्रामाणिकपणे प्रयत्न केला व तडीस नेला.लोकांची साथ,कार्यकर्त्यांचे मोहोळ व परिश्रम करण्याची दांडगी इच्छाशक्ती,अशा बहुमोल शिदोरीवर पाहिलेले विकासाचे व्हिजन,पिता-पुत्र प्रत्यक्षात उतरवू शकले.आ.हितेंद्र ठाकूर ५ वेळा व आ.क्षितीज ठाकूर २ वेळा आमदार म्हणून वसईकर जनता त्यांना डोक्यावर घेत आली ते उगाच नाही.कठोर परिश्रमाला कधीच पर्याय नसतो,त्यामुळे या दोघांना आणखी २० वर्षे तरी पर्याय नाही,असं म्हंटल्यास वावग ठरू नये.ज्यांचे उभे आयुष्य शहरात व्यतीत झाले,ज्यांना ग्रामपंचायत म्हणजे काय ते माहीत नाही,वसईचा कुठला भाग कोणत्या मतदारसंघात येतो,हे माहीत नाही,ज्याना आपल्या गावातील साधी ग्रामपंचायत जिंकता येत नाही,ती मंडळी जर बेडकासारखी फुगून आव्हाने देऊ लागली तर हसावे कि रडावे हेच कळेनासे झाले आहे.