
रुबीना मुल्ला | वसई प्रतिनिधी
वसईचा तरुण अमित सिताराम राठोड याने हिमालयातील थरारक आणि आव्हानात्मक चढाई करत 15,700 फूट (4,800 मीटर) उंचीवरील शितिधार शिखर सर केलं आहे. ही कामगिरी केवळ साहसाची नाही, तर जिद्द, चिकाटी आणि शौर्याची झलक आहे.
अमित यांनी हिमाचल प्रदेशातील अटल बिहारी वाजपेयी माउंटेनियरिंग अँड अॅडव्हेंचर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (ABVIMAS), मनाली येथे बेसिक माउंटेनियरिंग कोर्स (BMC) पूर्ण केला. हा कोर्स भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने घेतला जातो व तो शारीरिक आणि मानसिक ताकदीची कसोटी मानला जातो.
चढाईचा प्रवास :
- सुरुवात: मनाली येथून
- मार्ग: सोलांग नाला → बकरथाच बेस कॅम्प
- शिखर: पिर पंजाल पर्वतश्रेणीतील शितिधार शिखर
या मोहिमेत अमितने बर्फाच्छादित वाटा, कठीण हवामान, आणि तंत्रशुद्ध दोर वापर, आपत्कालीन बचाव उपायांसह अनेक अडथळ्यांवर मात केली.
पुढचं ध्येय – एव्हरेस्ट!
अमित राठोड आता कंचनजंगा आणि एव्हरेस्टसारखी जगातील सर्वोच्च शिखरं सर करण्याच्या तयारीत आहेत. वसईकरांचा अभिमान असलेल्या या युवकासाठी जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
“हिमालयातील अनुभवाने मला आत्मविश्वास आणि संयम शिकवला. माझं पुढचं स्वप्न एव्हरेस्ट सर करण्याचं आहे.”
— अमित सीताराम राठोड, वसई
