

माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत बहुजन विकास आघाडीचे एक महत्त्वाचे नेते आहेत. पराकाष्ठेची जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांचा या पदापर्यंतचा प्रवास आहे.
वसई-विरार शहराच्या राजकीय-सामाजिक पटलावर पदार्पण करून त्यांना 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रशांत राऊत यांचे विभागातील विविध विकास आणि सामाजिक कामांत अतुलनीय योगदान आहे. येथील जनसामान्यांत सामाजिक, सांस्कृतिक, आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
विविधलक्ष्यी कामगिरीतून प्रशांत राऊत यांनी बहुजन विकास आघाडीच्या पायाभरणीसाठी आपले सर्वस्व वाहून घेतले आहे. अर्थात, या आलौकिक कामगिरीत त्यांना मार्गदर्शन मिळते ते लोकनेते हितेंद्र?ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर, प्रथम महापौर राजीव पाटील आणि बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव असलेले अजीव पाटील यांचे!
बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून विविध विकासकामे करून प्रशांत राऊत यांनी जनमानसाच्या हृदयावर आपला ठसा उमटवला आहे. इतकेच नव्हे; तर माणूस म्हणूनही ते वेगळे आहेत. सामान्य माणसांच्या अडीअडचणीला धावून जातानाच; प्रत्येक माणसाच्या मनात बहुजन विकास आघाडीची रुजवात करण्याचे महत्त्वपूर्ण काम करून त्यांनी आज आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. जातीविरहित, वर्गविरहित, आणि लोकशाहीप्रणीत समाजाची निर्मिती हा त्यांचा ध्यास आहे. तोच त्यांच्या माणुसकीचा मूलाधार आहे.
त्यांचा दृष्टिकोन, त्यांची ध्येयधोरणे आणि विविध समस्या हाताळण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, व्यूहरचना यातून त्यांची बहुजन विकास आघाडीसाठीची तळमळ आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रतिचे प्रेम प्रतित होते. व्यक्तिश: त्यांच्या जडणघडणीची प्राथमिक प्रेरणा आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर हेच आहेत. ही द्वयीच त्यांच्या अखंडित उर्जा आणि उत्थानाची चिरंतन प्रेरणा आहे.
अलौकिक आणि बहुआयामी प्रतिभेचे धनी असलेले प्रशांत राऊत यांच्या कार्यालयात अडीअडचणी, समस्या घेऊन येणार्या सामान्य माणसांची गर्दी पाहिली की, प्रशांत राऊत यांचे खरे कार्य आपल्या लक्षात येते. ते अधिकाधिक मनाला भिडतात. कोणत्याही सामान्य कार्यकर्ता किंवा नेत्याला हा अनुभव अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी ठरावा.
आपण ज्या समाजात जन्मलो, वाढलो किंवा वावरतो; त्या समाजाला सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांची अहोरात्र धडपड, तगमग त्यांच्या कामातून दिसून येते. बहुजन विकास आघाडीच्या विचारांचा वारसा लक्षावधी जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत त्यांना समजेल, उमजेल अशा स्वरूपात पोहोचवण्याचा ध्यास त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतो.
प्रशांत राऊत यांचे विचार त्यांचे अनुयायी, त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ज्ञानसाधना करणारे अभ्यासक, नेते, कार्यकर्ते आणि हितचिंतक अशा सर्वांनाच त्यांची कामगिरी प्रेरक ठरावी.
अशा या हृदयस्पर्शी प्रशांत राऊत साहेब यांचा आज 51 वा वाढदिवस. यानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा!