मुंबई दि (प्रतिनिधी)
सायन किल्ल्याच्या डोंगराचा भाग तोडून टोलेजंग इमारती बांधण्यात येत असून बेकायदेशीर खोदकाम रोखुन राष्ट्रीय संपत्तीचे जतन करन्यासाठी आंदोलन उभारू अशी चेतावणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिली.

सायन किल्ल्याजवळ खोदकाम केले जात आहे त्या जमिनिजवळ प्राचीन काळापासून हनुमान मंदिर आहे, हे मंदिर पुरातत्व खात्याने हेरिटेज म्हणून घोषित केले आहे.
शिवाय बाजूलाच ५०० मिटर अंतरात सायन किल्ला ही आहे तो ऐतिहासिक वारसा आहे. मात्र विकासक ही राष्ट्रीय संपत्ती नष्ट करत असल्याचा आरोपही डॉ. माकणीकर यांनी तक्रारीत केला आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाने १ जुलै २०१३ रोजी अपील क्रमांक ४८२३/२०१३: (२०१३) ८ एससीसी ४१८ हेरिटेजच्या कोर झोन मध्ये खोद कामावर बंदी घातली आहे. वारसा स्मारके / स्थळाच्या झोन मधील स्मारके / स्थळ आणि प्रतिबंधित खान उपक्रम. दिलेल्या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने १ मेल त्रिजेच्या आत कोणतेही खोदकाम अनि खानकाम न करण्याचे निर्देश दिले असल्याचा संदर्भ ही डॉ. माकणीकर यांनी दिला आहे

हेरिटेज असलेल्या जागेवर मेसर्स सहाना कन्स्ट्रक्शन नावाचा विकासक खोदकाम करत आहे, हा भारतीय न्यायप्रणालीचा अपमान आहे. त्यामुळे सदरचे काम त्वरित रोखण्यात यावे व कधीही भरून ना येणारे नुकसान करण्यापासून रोखावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) तीव्र आंदोलन करेल. असा इशारा प्रशासनाला इमेल द्वारे विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *