वृत्तानुसार भारतातील दु-चाकी क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून लाखो ग्राहकांच्या पसंतीची भरोसेमंद कंपनी आहे. ज्यावर ग्राहक फक्त होंडा या नावावर भरोसा ठेवून त्या कंपनीने तयार केलेल्या विविध प्रकारातील दुचाकी विकत घेतात. त्यातील काही ग्राहक हे रोख रकमेने तर काही कर्ज काढून ही दुचाकी वाहन खरेदी करतात. त्यातीलच अतिशय लोकप्रिय अशी होंडा कंपनीची शाईन (BS VI ) ही दू - चाकी नव्या फीचर्स द्वारे पुन्हा ग्राहकांसाठी उपलब्ध केली. परंतु ही होंडा कंपनी त्या शाईन ( BS VI ) ह्या प्रकारातील दु - चाकी वाहनाची नव्या फीचर्स ने उपलब्ध करून देण्याच्या नादात तिची योग्य तपासणी करण्यास विसरली असावी व कंपनी कडूनच त्या शाईन (BS VI ) ह्या प्रकारात काही तांत्रिक बिघाड आढळला. शाईन BS VI हे दुचाकी वाहन आपण विकत घेतल्यावर काही दिवसातच हा तांत्रिक बिघाड दिसून येतो. तांत्रिक बिघाड अगदी शुल्लक वाटत असला तरी तो ग्राहकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. तो तांत्रिक बिघाड काही एक अशा प्रकारचा आहे की, चालक जेव्हा हे दुचाकी वाहन चालवीत असतो; त्यावेळी अचानक हे वाहन पूर्णपणे बंद पडते त्या वाहनाच्या सर्व सिस्टिम बंद पडतात व ती दुचाकी ज्या वेगात आहे तो वेग न पकडता अचानक हळू होऊन जागेवर थांबते. ज्यामुळे त्या चालकाच्या मागून येत असलेल्या वाहनाची जोरदार धडक होऊन अपघात होण्याची शक्यता जास्त आहे, ज्यात ग्राहक चालकाचा जीव जाऊ शकतो. आणि केवळ देव बलवत्तर म्हणून अनेक चालक ग्राहकांचे प्राण वाचले आहेत. याबाबत ग्राहकांनी आपल्या नजीकच्या होंडा सर्व्हिस सेंटर मध्ये या बंद पडलेल्या शाईन (BS VI ) हे वाहन जमा करून त्याबाबत चौकशी केली असता तेथील सर्विस/सेल्स मॅनेजर अथवा कर्मचारी स्वतः सांगतात की या दुचाकीत खरोखर तांत्रिक बिघाड असून तो बिघाड दुरुस्त करण्यास किमान १५ दिवस ते १ महिन्याचा कालावधी लागू शकतो. आणि तो बिघाड का झाला? याबाबत चौकशी केल्यास अनेक थातुर - मातुर उत्तर देऊन ग्राहकांची फसवणूक करून त्यांना मूर्ख बनविले जाते. सदर बाबतीत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वसई शहर प्रमुख श्री राहुल कांबळे यांनी वसई भाबोला येथील आदित्य होंडा शोरूम ला स्वतः भेट दिली असता सदर प्रकार उघडकीस आला असून अशा बंद पडलेल्या शाईन (BS VI ) प्रकारातील दुचाकी वाहन अन त्या शोरूम मध्येच कमीत कमी ३० दुचाकी असून इतर अनेक होंडा शोरूम मध्ये या प्रकारातील दुचाकी बाईक दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. पाणी या प्रकाराबाबत आदित्य होंडा, बाभोला वसई येथील सर्विस मॅनेजर भूपेश राऊत यांना विचारले असता "जर ह्या दुचाकी वाहनात तांत्रिक बिघाड आहे हे माहित पडले असता त्याच वेळी ज्या ज्या ग्राहकांनी हे नवीन फीचर्स मधील शाईन BS VI दुचाकी वाहन खरेदी केले आहे त्यांना आपली दुचाकी सर्विस सेंटर मध्ये जमा करण्यास का कळविले नाही..?? कशासाठी लोकांच्या जीवाशी खेळून त्यांचा जीव धोक्यात घालत आहात..??" असे विचारले असता, भूपेश राऊत म्हणाले " आम्हाला तशा सूचना होंडा कंपनीने दिले नाही." तसेच आदित्य होंडा शोरुमचे जनरल मॅनेजर सत्यजीत पाटील यांना ही संपर्क साधला असता त्यांच्याकडूनही कोणत्याही प्रकारचे समाधान कारक उत्तर मिळाले नाही. ह्यावरून असे स्पष्ट कळते की होंडा कंपनी जी आपल्या नावाने नावजलेली लोकप्रिय कंपनी आहे. तिला आपल्या ग्राहकांची कोणत्याही प्रकारे काळजी नसून त्यांच्या जीवाशी काहीएक देणे - घेणे नाही. ह्या करीता शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वसई शहर प्रमुख श्री राहुल कांबळे यांनी ग्राहकांना आवाहन केले आहे की, ज्या ज्या ग्राहकांना असा कटू अनुभव आला आहे. त्यांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाशी संपर्क साधावा.