प्रा. डी. एन. खरे यांच्या दणक्याने भ्रष्टाचारी ठेकेदारांनी मुद्रांक शुल्क भरणा केला, परंतु भ्रष्टाचारा विरोधातील लढाई अजून संपलेली नाही.

दोषी असलेल्या सर्व १० ठेकेदारांचे नियमानुसार लायसन्स काळ्या यादीत टाकून इसारा रक्कम जप्त करा अन्यथा आयुक्त कार्यालयासमोर करणार आमरण उपोषण. – प्रा. डी. खरे

विरार दि. २०/०६/२०२४, वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभाग समिती A,B,C,D,E,F,G,H,I मध्ये दैनंदिन रस्ते सफाई, गटार सफाई व घरोघरी जाऊन कचरा संकलित करून क्षेपणभूमीवर वाहतूक करणे ह्या कामाचा कंत्राट १) मे. श्री. अनंत एन्टरप्रायजेस, २) मे. उजाला लेबर कॉन्ट्रॅक्टर, ३) मे. साई गणेश एंटरप्राइजेस, ४) मे. रेनबो कन्स्ट्रक्शन, ५) मे. दिनेश बी. संखे, ६) मे. रिलायबल एजन्सी, ७) मे. हेना इंटरप्रायजेस, ८) मे. मॅनदीप इंटरप्रायजेस, ९) मे. शिवम इंटरप्रायजेस, १०) मे. आर. बी. इन्फ्रा प्रा. लि. ह्या १० कंत्राटदार यांना देण्यात आलेला आहे.

वरील सर्व ठेकेदारांना सन- २०१६-१७ ते २०२३-२४ या कालावधीत अनेक वेळा मुदतवाढ कार्यादेश देण्यात आलेत. त्यापैकी मा. आयुक्त, अनिलकुमार पवार यांनी स्वतः एकाच दिवशी दि. ०६/०४/२०२२ रोजी २० मुदतवाढ कार्यादेश स्वाक्षरी केलेत. काही मुदतवाढ कार्यादेश अतिरिक्त आयुक्त श्री. संतोष देहेरकर, उपायुक्त श्री. अजिंक्य बगाडे व उपायुक्त डॉ. चारुशीला पंडित यांच्या सहीनिशी काढण्यात आलेत. मात्र ठेक्याच्या रक्कमे नुसार मुद्रांक शुल्क भरून त्या-त्या ठेक्याचे नवीन करारनामे करण्यात आले नाहीत अशी माहिती दि. २७/०२/२०२४ रोजी च्या जावक क्र.:व.वि.श.म./आरोग्य/६२७/२०२४ या पत्रा अन्वये उपलब्ध झाली. तसेच नवीन करारनामे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अभिलेखात उपलब्ध नसल्याची माहिती प्राप्त झाली. नियमसुसार महानगरपालिका व ठेकेदार यांच्यात त्या-त्या कालावधीसाठी ठेक्याच्या रक्कमे नुसार नवीन करारनामे करून मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते.

परंतु भ्रष्टाचारी मार्गाने व नियमबाह्य पद्धतीने ठेकेदारांचे हित खुद्द आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडून जोपासल्या जात असून सदरचे करारनामे न केल्याने सन- २०१६-१७ ते २०२३-२४ या कालावधीत रु. १,१११,३४,३१,५५२/- (एकहजार एकशे अकरा करोड, चौतीस लाख, एकतीस हजार पाचशे बाव्वन) येवढ्या रकमेच्या ठेक्याचे मुद्रांक शुल्क महसुलाचे अंदाजित रु. १,०८,३२,०००/- (एक कोटी आठ लाख बत्तीस हजार) रुपये इतके नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारे कामाच्या मुदतवाढ कार्यपद्धतीत हेतुपुरस्सर केलेल्या अनियमततेच्या विरोधात महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ठेकेदारांकडून केवळ मुद्रांक शुल्क भरून घेऊन हात झटकले. भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार त्यांच्या विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई आयुक्त अनिल कुमार पवार यांनी केलेली दिसून येत नाही. त्यामुळे बहुजन समाज पार्टीने सदरच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविल्या नंतर दहा ही ठेकेदारांनी दि. १४/०३/२०२४ रोजी मुद्रांक शुल्क भरणा केला. सदस्य विषय मुद्रांक शुल्क भरून मिटणार नाही तर अशा प्रकारे भ्रष्टाचार करू पाहणाऱ्या ठेकेदारांचे लायसन काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी प्रा. डी . एन. खरे यांनी लावून धरली आहे.
सर्व १० ठेकेदारांचे नियमा नुसार लायसन्स काळ्या यादीत टाकून ठेके रद्द करून त्यांची इसारा रक्कम जप्त करण्यात यावी. अन्यथा बहुजन समाज पक्ष लवकरच अशा भ्रष्टाचारांना धडा शिकविण्यासाठी महापालिका कार्यालयासमोर आंदोलन करणारा असल्याचा इशारा प्रा. डी. एन. यांनी दिला.

PDFGallery_20240620_135232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *