
विरार दि. १६/०६/२०२५, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती अंतर्गत जि. प. शालेय विध्यार्थ्यांना मागील वर्षी दप्तर, छत्री, रेनकोट, वही, ड्रॉईंग बुक, कंपास बॉक्स, वॉटर कलर, कलर बॉक्स, पेन्सिल बॉक्स इत्यादी शैक्षणिक साहित्य निर्देशित कालावधीत वाटप न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले होते. त्याबाबतची माहिती जा.क्र. :व.वि.श.म./म.बा.क/१८५/२०२४-२५ दि. ०४/१२/२०२४ रोजीच्या पत्राद्वारे जन माहिती अधिकारी तथा सहा. आयुक्त महिला व बालकल्याण विभाग, वसई-विरार शहर महानगरपालिका यांच्याकडून प्राप्त झाली.
मागील वर्षी वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळेंना प्रत्येक्ष भेट देऊन चौकशी केली असता पावसाळा सुरु होण्यापूर्वी शालेय विधार्थ्यांना कोणतेही साहित्ये वाटप केले नसल्याचे विध्यार्थी, पालक व शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी प्राध्यापक डी. एन. खरे यांना सांगितले होते. तसेच सदरचे शालेय शैक्षणिक साहित्य कार्यदेशात निर्देशित केलेल्या कालमर्यादित विद्यार्थ्यांना वाटप न केल्याने प्राध्यापक डी. एन. खरे यांच्या तक्रारीनंतर ठेकेदारांना दंडित करण्यात आले होते.
मागील वर्षी महापालिकेतील बे-जबाबदार अधिकाऱ्यांमुळे व अकार्यक्षम ठेकेदारांमुळे निर्धारित कालावधीत शालेय साहित्ये पुरवठा न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले होते. तसेच रेन कोट व छत्री पावसाळ्यापूर्वी वाटप न केल्याने विध्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात भिजत शाळेत जावे लागले. त्यामुळे महापालिकेने वाटप केलेल्या रेनकोट व छत्री वाटपाचा कोणताही उपयोग मागील वर्षी विद्यार्थ्यांना झाला नसल्याची तक्रार आयुक्त यांच्याकडे खरे यांनी केली होती.
ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या दोषामुळे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा उपयोग गरजेच्या वेळी करता आला नाही. तसेच वही, ड्रॉईंग बुक, कंपास बॉक्स, वॉटर कलर, कलर बॉक्स, पेन्सिल बॉक्स हे साहित्ये शाळा सुरु होताच म्हणजे जून महिन्यात साहित्ये वाटप करणे अपेक्षित होते. मात्र मागील वर्षी सदरचे साहित्ये ऑक्टोंबर महिन्यात विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झालेले होते.
तरी, सदरची अनियमितता सन- २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात परत होऊ नये याची खबरदारी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी स्वतः घेऊन तत्परता दाखवावी. असे आव्हान प्राध्यापक डी. एन. खरे यांनी केले.


