


रविवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२१, “व्हेलेन्टाइन दिनी”” सकाळी ९ ते संध्या.५ या वेळेत वाघोली, नालासोपारा( प)येथील ‘पीटर दि रॉक्स’ या बंगल्यात( माफी मैदान)अभंग सेवा समिती,वसई आणि माफी ट्रस्ट,वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने ३४ वा दिव्यांग सदिच्छा मेळावा संपन्न झाला.सदर मेळाव्यात ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील दिव्यांग व अनाथजन मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
वसई विरार मधील नामांकित उद्योगपती मा.पीटर फर्नांडिस यांची जेष्ठ सुपुत्री टॅनिया हिचा विवाह दिनांक ७.२.२०२१ रोजी मार्क डाबरे यांच्या बरोबर अत्यंत धुमधडाक्यात संपन्न झाला. सदर विवाहप्रसंगी वधुवरांस आशीर्वाद देण्यासाठी समाजातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. समाजभान जपणारी वृत्ती असणा-या पीटर फर्नांडिस यांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा पार पाडल्या नंतर जराही उसंत न घेता भव्यदिव्य अशा ‘दिव्यांग व अनाथ सदिच्छा मेळाव्याचे’ आयोजन केले होते
दिवसभर चाललेल्या स्नेह मेळाव्यात प्रार्थना, क्रीडा स्पर्धा, संस्कृतिक कार्यक्रम, जिद्द व इतर पुरस्कार, ‘अभंग’ प्रकाशन, सहभोजन व शेवटी जाहीर सभा अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
संध्याकाळी चार वाजता सुरू झालेल्या खुल्या मेळाव्याचे अध्यक्ष स्थान फिनिक्स फाउंडेशन, अपंगांसह ट्रेकिंग मोहीमेचे संचालक श्री.संतोष एम. संसारे यांनी भूषविले
फादर मायकलजी,सिंथिया बॅप्टिस्टा, अपंग सेवाश्री आणि पिटर फर्नाडीस आणि त्यांच्या पत्नी मोनिका पीटर फर्नांडिस ( माफी ट्रस्ट) ,फादर एलायस रॉड्रिग्ज, बसीन कॅथॉलिक बॅंकेचे व्हाईस चेअरमन मनवेल लोपीस व संचालक पायस मच्याडो,’निर्भय’चे निदान डायग्नोस्टिकचे डॉ.नितीन थोरवे, व.वि.महानगर पालिका प्रभाग समिती सभापती लॉरेल डायस, फादर बाप्टिस्टा लोपीस व फ्रान्सिस डाबरे हया मान्यवरांनी मेळाव्यासाठीआलेल्या दिव्यांगांना मार्गदर्शन केले,या मेळाव्यास आल्मेडा रॉबर्टसर ह्यांनी त्यांच्या ५१ व्या वाढदिवसा व २२ व्या वेंडिग ऍनिवरसरी, लग्नाचा वर्धापन दिनानिमित्ताने ₹-१४२५१/– देणगी अंपग सेवा, अंभग भवन, भाबोळा,वसई या संस्थेला देणगी दिली
सुरेश दिब्रिटो व शिला डिसोजा यांनी खुला मेळाव्याचे सूत्रसंचालन केले.मोनिका फिटर फर्नांडिस यांनी आभार प्रदर्शन केले.प्रा. प्रसाद डाबरे, रॉबर्ट अल्मेडासर यांनी समन्वयकाची भूमिका पार पडली. हा अनोखा
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील स्पोर्ट्स टीचर्स,अनेक सेवाभावी संस्था व कार्यकर्ते तसेच मर्देस युवा संघ,सेंट जोसेफ कॉलेजचे विद्यार्थी व कर्मचारी इत्यादींनी परिश्रम घेतले असा ३४ वा दिव्यांग मेळावा भव्य दिव्य प्रमाणात, दिव्यांग बंधु भगिनीना प्रेम, आनंद देऊन साजरा करण्यात आला.