

नागपूर, दि. ३० सप्टेंबर २०२० : बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने आज दिलेला निकाल धक्कादयक असून या निर्णयाचा पुन्हा विचार करणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी व्यक्त केले.
बाबरी मशीद पाडण्यासाठी संघ परिवारातील सर्व शाखा त्यातील भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद आदी संघटनां द्वारे राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात आली. देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांच्या नेतृत्वाखाली यात्रा काढण्यात आल्या, त्यात उमा भारती, ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आदींचा सक्रिय सहभाग होता. यासाठी देशात दंगली घडविल्या. यात हजारो निष्षापांचा बळी गेला. त्यावेळी १५ लाख लोक अयोध्येला जमा झाले होते. ते कोणाच्या नेतृत्वाखाली तिथे आले होते? याचे पुराव्यासह वृत्तांकन वृत्तपत्रांमधून व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाने पाहिले आहे. भारतीय जनता पक्ष हा बाबरी मज्जिद पडण्याचे राजकारण करून देशातील विविध ठिकाणी सत्तेत आला. आणि आज देशात सत्तेत आला, याचा सुद्धा विचार केला पाहिजे, असेही मा.आमदार प्रकाश गजभिये यांनी आपले मत व्यक्त केले.