
जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही.तो पर्यंत महापालिकेला घेराव घालुन राहण्याचा ईशारा – शेरु वाघ
वसई (प्रतिनिधी): गेल्या काही महिन्या पासुन वसई विरार महानगर पालिके ला शिस्तीने व शांती ने लाल बावट्याच्या वतीने अनेक निवेदन देण्यात आली त्या निवेदनेला मनपाच्या आयुक्त गंगाधर डी यांनी केराच्या टोपल्या दाखवल्या अनेक वेळा निवेदन देउन देखील आज पर्यंत आयुक्तांनकडुन एकही उत्तर मिळाले नसल्याने आत्ता लाल बावट्याने मोर्च्या चे हत्त्यार हाती उचलताना दिसुन येत आहे. अनेकदा आयुक्तांना निवेदना मार्फत आंदेलनाचे इशारे देण्यात आले होते.ह्यावर आयुक्तांनी दुर्लक्ष केले.आत्ता मात्र मोर्च्या शिवाय पर्याय नाही असे भारताचा माक्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा)जिल्हा कमेटी सदस्य शेरु वाघ यानि सांगीतले ९आँगस्ट हा जागतीक आदिवासी दिन व आँगस्ट क्रांन्ती दिना निमित्ताने हा मोर्चा काढण्यात येणार आहे ९ आँगस्ट ला जरी रविवार असला तरी मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्या करता आयुक्तांनी उपस्थित राहावे अन्यंथा महापालिकेच्या कार्यालयाला बे मुद्दत घेराव घालुन बसु जो पर्यंत जनतेचे प्रश्न सुटत नाहीत.तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची माहीती लाल बावट्याच्या कार्यकर्ते देत आहेत
मोर्च्यात हजारोच्या संख्येने संपुर्ण पालघर जिल्ह्यातील सर्व सामान्य जनता उतरावे म्हणुन गावा पाड्यात जाउन जोरात प्रचार चालविला आहे.
मोर्च्यात मागण्या
१)१७५ सफाई कामगारांना महानगर पालिकेने नोटिस न देता बेकायदेशिर पणे कामावरुन काढले आहेत.त्यांना तात्काळ कामावर पुन्हा घ्या
२)सफाई कामगारांना जेव्हा पासुन कामावरून काढले ते जो पर्यंत कामावर घेत नाहीत तो पर्यंत चा पगार १८ टक्के व्याजासह भरुन द्यावाच लागेल
३)लाँकडाउन च्या काळातील संपुर्ण विज बिल माफ करा म्हणून केंद्र सरकारला शिफारस करा तसेच जो पर्यंत बिल माफ होत नाही.तोर्यंत बिल वसुली करणे बंद करा
४) पिढ्यान पिढ्या पासुन वाडी खाडी मधे राहात असलेल्या घरांना घरपट्टा आकारणी झालीच पाहीजे
५)सत्पाळा सांभाळे तलाव व आगाशी धोबीतलाव ह्या तलावाला संरक्षण भिंत बांधलीच पाहीजे*
अश्या मागण्या घेवुन लाल बावट्याच्या वतीने माहापालिकेला घेराव घालण्याची च जोरदार तयारी चालविली आहे..
