
नालासोपारा दि.०२/०३/२०२५, भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, वकील, प्रोफेसर राजकारणी प्रवेश करत असताना भाजपाचे वसई विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डी. एन. खरे यांनी पक्ष वाढविण्याचे काम सुरू केले असून ॲड. लताशा निवळे यांना भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये सोबत घेऊन नालासोपारा विधानसभेचे आमदार राजांची नाईक यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला. यावेळी नईम इद्रिसी, मायकल डिसूजा, शांतेश्वर गुमते, प्रदीप यादव, बंटी सिंग, कार्तिक सिंग समीर सय्यद इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.