
वसई : (प्रतिनिधी) : परराज्यातून मुलींना नोकरीचे आमीष दाखवून मुंबईत किंवा आजूबाजूच्या उपनगरात आणून नंतर त्यांना वेश्या व्यवसायात ढकळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. आत्तापर्यंत वसई-विरारमधून अशा अनेक गुन्ह्यांची अनैतिक मानवी वाहतूक शाखेने पोळकोल केली आहे. नुकतेच अशाच पद्धतीने महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकळणार्या आरोपींच्या मुसक्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी आवळल्या असून या व्यवसायातून 3 महिलांची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी 3:15 वाजताच्या सुमारास नालासोपारा पोलिस ठाणे हद्दीतील नालासोपारा पश्चिम स्टेशन रोड डॉमिनोज पिझ्झा येथे 3 आरोपींनी वेश्या व्यवसायात 3 पीडित महिलांना ढकळले होते. सदर महिला वेश्या व्यवसाय करित असताना मिळून आल्या. याप्रकरणी आरोपीविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करित आहेत.
सदरची कारवाई अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचार्यांनी केली.