
पालघर दि.25 :- पालघर येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दि. 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस परेड मैदान, कोळगांव, जैनेसिस औद्योगिक परिसराच्या बाजूचे मैदानात कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8.30 ते 10.00 वा. च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. तसेच सदर शासकीय समारंभासाठी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा व सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.
०००००