
अनुसूचित जमातीच्या विध्यार्थांना टॅब, सायकल आणि जातीचे दाखले पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वाटप


पालघर दि 25 :उपजिल्हा रुग्णालय, डहाणू येथे कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ,सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक विजय काळबांडे आदी उपस्थित होते.
जिल्हा ऑक्सिजन बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा या साठी पालकमंत्री श्री भुसे यांनी जिल्हा नियोजन समिती मार्फत ऑक्सिजन निर्मिती साठी विशेष निधी राखीव ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते. या निधीच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय, डहाणू येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला तसेच जिल्ह्यातील इतर रुग्णालयात देखील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहेत.
अनुसूचित जमाती मधील विध्यार्थ्यांना टॅब चे वाटप तसेच कातकरी समाजातील विध्यार्थीना सायकल चे वाटप आणि 8 वी ते 10 वी पर्यंत च्या विध्यार्थ्यांना जातीचा दाखला शाळेतच उपलब्ध करावा अशा सूचना जिल्हा प्रशासनाला पालकमंत्री श्री भुसे यांनी केल्या होत्या जिल्हा प्रशासनाने जलद गतीने काम करून विध्यार्थ्यांना कमी वेळात जातीचे दाखले उपलब्धकरून दिले.
डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी बोर्डी येथील समुद्र किनारी पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी बोर्डी समुद्र किनारा पाहणी दरम्यान सांगितले