
पालघर(प्रतिनिधी)- देशाला प्रजासत्ताक होऊन आज ७२ वर्षे झाली तरीही ,ज्या देशाचे भूमीचे रक्षण आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तू गडकोट किल्ले यांनी केले ते किल्ले आज नामशेष व पडझड होताना डोळ्यासमोर दिसत आहेत. याचाच अर्थ देश आज प्रजासत्ताक आहे पण केवळ नावापुरते.जेव्हा प्रजेची म्हणजेच रयतेची सत्ता सर्व एकत्र येऊन आपल्या इतिहासाच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी,जतानासाठी एकत्र येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने देश तेव्हा प्रजासत्ताक होईल.हीच संकल्पना समोर ठेवून डी.आर फोर्स महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष जयकांत शिंक्रे व टीम दुर्ग रक्षक फोर्स संस्थेने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांच्या सीमेवर असणारा एक प्राचीन इतिहास असलेला एका अभेद्य काजळी गावातील बल्लाळगड किल्याचे संवर्धन कार्य हाती घेऊन या इतिहासाच्या रक्षणाचा एक ऐतिहासिक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.प्रथम गडावरील सर्व गडदैवत, ग्रामदैवत ,साहित्यपूजन, राष्ट्रगीत घेऊन तिरंग्याला सलामी देऊन अपरिचीत दुर्ग अभ्यासक जयकांत शिंक्रे यांनी किल्याचा सर्व इतिहास सांगून मोहिमेला सुरवात करण्यात आली.या मोहिमेला काजळी ग्रामपंचायत सरपंच इतर सर्व ग्रामपंचायत सहकारी, ग्रामस्थ ,शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, विध्यार्थी,स्थानिक वनविभाग ,वापी येथील आई भवानी सेवा ट्रस्ट ,छत्रपती शंभाजी ब्रिगेड सिल्वासा ,शिवराज युवा प्रतिष्ठान द्रोणागिरी उरण ,शिव आज्ञा परिवाराच्या शलाका पवार,दीपक भिर्डे व सुजित खैरे ,सामाजिक विभाग प्रमुख जगदीश बरप,गोरेगाव येथील इतिहासप्रेमी प्रमोद पडळकर व त्यांचे इतर सहकारी आणि विशेष म्हणजे स्वराज्याची राजधानी रायगड घडवणारे हिरोजी इंदळकर यांचे तेरावे वंशज प्रशांत प्रताबराव इंदुलकर प्रतक्ष्य येऊन मोहिमेला शुभेच्छा दिल्या.