दिनांक २८/०१/२०२२ रोजी वसई पूर्व पट्टीतील शेतकऱ्यांसाठी राज्य शासन व केंद्र सरकार पुरस्कृत विविध शेती योजनांची माहिती व लाभ मिळण्याकरिता ‘आत्मा’ समिती अंतर्गत वसई तालुक्यातील शिरसाड येथे शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कृषी अधीक्षक व तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत राज्य शासन व केंद्र सरकार पुरस्कृत योजनेकरीता लाभार्थी निवड,निकष,अनुदान याची माहिती देण्यात आली.तसेच शेतकऱ्याना योजनेचा लाभ मिळण्यात होत असलेल्या अडचणीचे निराकरण करण्यात आले.याप्रसंगी आमदार राजेश पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आत्मा समितीवरील सर्व सदस्यांना जास्तीत जास्त योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासंदर्भात आवाहन केले. तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांना गट स्थापन करण्याच्या सूचना दिल्या.तसेच माजी खासदार बळीराम जाधव यांनी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांना योजनांची माहिती व नुकसान ग्रस्थ शेतकऱ्यांच्या जागेत जाऊन पंचनामा करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
यावेळी या कार्यक्रमासाठी वसई पंचायत समिती सभापती गीता पाटील,जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी,पंचायत समिती सदस्य अशोक पाटील,माजी बांधकाम सभापती पांडुरंग पाटील,जिल्हा कृषी अधिकारी नेरकर सर,पालघर पंचायत समिती उपसभापती चेतन पाटील,माजी जी प सदस्य जीवन सांबरे, वसई तालुका कृषी अधिकारी, पालघर तालुका कृषी अधिकारी तरुण वैती, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पालघर/वसई मनोज वाकळे, पंचायत समिती कृषी अधिकारी स्मिता पाटील,तसेच कृषी विभागातील सर्व अधिकारी ,आत्मा समितीचे सर्व नवनिर्वाचित सभासद आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *