
वसई प्रतिनिधी:- राज्यात शहरात बाहेरून येणारे परप्रांतीय लोंढे भविष्यात स्थानिक लोकांच्या हक्कांवर ताशेरे ओढणार एवढे नक्की.शहरातील स्थानिक आपल्याच राज्यात पाहुणा होऊ लागेल.स्थानिकांना आपले राज्य सोडावं लागेल अशी भय परिस्थिती निमार्ण होईल असे आता राज्यात येणाऱ्या परप्रांतीय लोंढे पाहून दिसून येते.शहरात वसण्यासाठी आलेली ही परप्रांतीय मंडळी कोणत्याही परिस्थितीत जमवून घेते.स्वस्तात घरे घेऊन त्याठिकाणी अजून मालमत्ता कशी निर्माण करता येईल याचाच विचार यांच्या मनी असतो.स्थानिक गावातील मुले या लोंढ्यानमुळे बेरोजगार होतील कारण आपल्या हक्काच्या नोकरीवर हे सामील होतील त्यामुळे शहरातील युवक बेरोजगारिकडे वळतील.काही जण वडीलो पारजीत जमिनी विकून काही वेळ मात्र मजा करतील पण येणाऱ्या पिढीला पुढील घटनांना सामोरे जावे लागेल.रोजगार मिळाला नाही तर गावगुंड बनून आपल्या भविष्याची वाट लावून घेतील.विकास होणे गरजेचे आहे परंतु शहरातील समतोल आणि येथील स्थानिकांना वाऱ्यावर सोडून नाही.शहरात तयार होणाऱ्या काँक्रीट जंगलामुळे स्थानिकांचे भविष्यातील अस्तित्व उध्वस्त होणार .असे दिसून येते.उद्देश एवढाच की आपलं भविष्य ओळखून संपूर्ण परिस्थितीची जाण राखून जमिनी विकण्याचा निर्णय स्थानिकांनी घ्यावा.कारण पुढील येणार काळ हा धावपळीच्या जीवनात खूप खडतर असेल.आपला हक्क आहे त्यासाठी कायद्यांनी लढण्याची तयारी ठेवा.प्रयत्न केला तर सर्व सोपे आहे.हे लक्षात ठेवा.