वसई ( प्रतिनिधी) शनिवार, रविवार वसई येथील समुद्र किनारी पर्यटक येतात. त्याचे सौंदर्य व निसर्गरम्य अशा परिसरात मौज मस्ती करतात व आपला विरंगुळा करतात, पण जाताना नैसर्गिक सौंदर्य,स्वच्छता बिघडवून जातात. तेथे सोबत आणलेल्या खाऊचे कागद,पाणी बाॅटल, विविध प्रकारच्या पेय बाटल्या इकडे तिकडे फेकून निघून जातात.
आणि म्हणूनच एक सुजाण नागरिकांचे कर्तव्य म्हणून व आपल्या नैसर्गिक संपत्तीच रक्षण करण्या, त्याची निगा राखण्यास वसईतील स्री सखी सज्ज झाली.
ओगळे सर, महानगरपालिकेचे सफाई कामगार यांच्या बरोबरीने आज स्री सखी चॅरिटेबल ट्रस्ट वसई च्या अध्यक्षा सौ. मनिषाताई कणेकर यांच्या सह त्यांच्या सख्यांनी आज मर्सिज बीच ची साफसफाई केली.

उद्देश—-आपल्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे.
निसर्ग सौंदर्य कायम स्वच्छतेत टिकविणे.
गरीब जनतेचा आवाज फाऊंडेशनच्या अध्यक्षा व इतर सदस्या ही ह्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.त्या मोहिमेत हजर असलेल्या स्त्री सखी चॅरिटेबल ट्रस्ट च्या कार्यकर्ते …..
सो. मनिषा कणेकर (अध्यक्ष)
श्रीमती.कोकिला जोशी ( सहकोषाध्यक्ष)
श्रीमती.रंजन सुतारिया ( सदस्य)
सौ.शुभांगी गुरव ( माजी सचिव)
सौ. माला मावरकर (आजीव सदस्य)
श्रीमती. मिना लोंबर (आजीव सदस्य)त्याच प्रमाणे गरिब जनतेचे अध्यक्ष जेरी मच्याडो हजर होते
ह्या सर्वाचे जेरी मच्याडो ह्यानी आंभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *