मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ रोजी आगरी सेनेच्या शिष्टमंडळाने आगरी सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. कैलास हरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालघरचे जिल्हाधिकारी मा. श्री. माणिकरावजी गुरसल साहेब यांची भूमिपुत्रांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात सदिच्छा भेट घेतली तसेच मा.जिल्हाधिकारी साहेबांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले.

▪️सदर बैठकीत आगरी सेनेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या प्रलंबित मागण्या व लोकहितास्तव मा. उच्च न्यायालयात् दाखल केलेल्या विविध जनहित याचिकांबाबत सविस्तर चर्चा झाली ह्यात प्रामुख्याने

१. सुरक्षा स्मार्ट सिटी ह्या बांधकाम विकासकाने राजावली टीवरी येथील ५३ एकर गुरचरण जागेवर नैसर्गिक नाल्यांची दिशा बदलून तिवरांच्या झाडांची केलेली बेसुमार कत्तल व त्यावर केलेले अनधिकृत बांधकाम यावर त्वरित कार्यवाही करावी व शासकीय गुरचरण जागेची मोजणी करावी ती तत्काळ ताब्यात घ्यावी.

२. मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचेकडील संदर्भीय पत्रानुसार शापुरजी अँड पालोनजी ह्या प्रकल्पासंदर्भातील अहवाल तत्काळ सादर करावा व त्यांना दिलेल्या अकृषिक परवानग्या रद्द कराव्यात.

३.शिक्षण महर्षी पद्मश्री भाऊसाहेब वर्तक हे सन१९९८ रोजी मयत झालेले असतानाही त्यांचे बनावट सही अंगठे मारून त्यांच्या नावाचे कुलमुखत्यारपत्र सन २००४ साली नोंदणीकृत करून ३२५ एकर जागेवर उभारलेल्या ग्लोबल सिटीची अकृषिक परवानगी तत्काळ रद्द करावी.
अशी आग्रही मागणी आगरी सेने मार्फत करण्यात आली

▪️तसेच सदर बैठकीत पालघर तालुक्यातील पंचम कोलंबी प्रकल्पला दिलेल्या ३००० एकर जागेचा प्रश्न देखील उपस्थित केला गेला त्यावर मा. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकल्पला कुठलीही मुदत वाढ दिली नसून.. प्रकल्पधारकाचा प्रस्ताव राज्यसरकारकडे विचाराधीन आहे अशी माहिती दिली.

▪️आगरी सेनेने वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने सदर कोळंबी प्रकल्पाच्या जागा स्थानिक महिला बचतगटांना रोजगारासाठी उपलब्ध करून देण्यासाठी शिफारस करण्याचे आश्वासन देखील मा. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले..

आज जिल्हाधिकारी मा. गुरसळ साहेबांचा वाढदिवस असून देखील आगरी सेनेच्या विविध आंदोलनाची तसेच जनहित याचिकांची दखल घेत जिल्हाधिकारी साहेबांनी सदर बैठकीसाठी एक तास दिला व सकारात्मक प्रतिसाद दिला त्याबद्दल कैलास पाटील ह्यांनी त्यांचे समस्त समाज बांधवांतर्फे आभार व्यक्त केले.

▪️मा. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या आजच्या सदिच्छा भेटीसाठी आगरी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. कैलास पाटील साहेब, श्री.चेतन गावड, श्री. विजय घरत, श्री.जयेश पाटील आणि आगरी सेनेचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *