
अनधिकृत बांधकामे रोखण्यात अकार्यक्षम ठरलेल्या सुभाष जाधव यांचे नवनियुक्त आयुक्त अनिलकुमार पवार निलंबन करतील का?

वसई: वसई विरार मधील अनधिकृत बांधकामे बघता लक्षात येते की पालिकेतील अधिकारी विकले गेले आहेत.उच्च न्यायालयाने महापालिकेला खडे बोल सूनवुनही महापालिकेची परिस्थिती ‘ ये रे माझ्या मागल्या ‘ सारखी झाली आहे.बेशिस्त विकासक अधिकाऱ्यांना खिश्यात घेऊन कोण्या महाराजांसारखा माज दाखवताना सध्या वसई विरार मध्ये दिसत आहे.असेच चालू राहिले तर ती वेळ दूर नाही की वसई विरार कॉक्रीट च्या जंगलाने भरलेले दिसेल.मुजोर अधिकारी महापालिका हद्दीतील जमिनी आपल्या बापाच्या असल्यासारखे बांधकाम करण्यासाठी विकासकांना पाठिशी घालत आहेत.
मुख्यता प्रभाग जी अंतर्गत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत.अनधिकृत बांधकामे वाढण्यामागे प्रभाग जी चे सहआयुक्त सुभाष जाधव हे कारणीभूत आहेत.असे निदर्शनास आले आहे.सुभाष जाधव नियुक्त झाल्या पासून प्रभाग जी मध्ये विकासकांचे दिवस पालटले.बेफिकीर काम करण्याची परवानगी जाधव विकासकांना देतात अशी काहीशी चर्चा जनमानसात आहे.शिवाय बातमी पत्रामध्ये ही सुभाष जाधव भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध असल्याचे चित्र निर्देशनास आले आहे.प्रभाग जी कार्यालयात सुभाष जाधव कधी तरी हजर असतात परंतु काही वेळात च निघून जातात कोणालाही आपली भूमिका मांडण्यासाठी वेळ देत नाहीत.पत्रकारांनी तक्रार करूनही त्यांना तक्रारीच्या उत्तरा बदल्यात केराची टोपली दाखवण्यात आली.सुभाष जाधव प्रभाग समिती जी हद्दीत अनधिकृत बांधकामाची वसुली करतात अशी चर्चा जोर धरू लागली आहे.मधल्या काळात भारतीय जनता पार्टी द्वारा सुभाष जाधव हरवल्याची जाहिरात ही करण्यात आली होती.आधीचे आयुक्त डी. गंगाथरण यांच्या आशीर्वादाने सुभाष जाधव यांनी प्रभागात विकासकांशी हातमिळवणी करून चांगलीच मजा केली असल्याचे दिसून आले. शिवाय सुभाष जाधव यांच्या बेनामी संपत्तीत वाढ झाली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. येणाऱ्या पुढील काळात नवीन नियुक्त आयुक्त अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवतील आणि त्यांना त्यांच्या कामाच्या बाबतीत अकार्यक्षमतेमुळे पदावरून निलंबित करतील अशी जनतेत आशा आहे.