

प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील उद्यानांच्या ठेक्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून नियमाप्रमाणे देखभाल होत नाही. आणि वाढीव किमतीचे ठेके दिले जात आहेत. तसेच महिला बचत गटांना ठेके देण्याचा नियम असताना महिला बचत गटाच्या नावे ठेके घेतले जातात मात्र महिला बचत गटाच्या आड दुसरेच कोणी उद्यान देखभालीचा कारभार सांभाळतात.
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील उद्यानांच्या ठेक्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून नियमाप्रमाणे देखभाल होत नाही अशा आशयाची तक्रार तसनीफ शेख, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक उपाध्यक्ष वसई विरार जिल्हा यांनी केली असून त्यांनी सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती आय यांना दिली आहे. प्रभाग समिती आय हद्दीत अनेक सार्वजनिक उद्याने आहेत. त्यापैकी वसईतील किल्ला गार्डन रु. १२, ०००/-, वसई न्यायालयाच्या बाजूला असलेला बगीचा रु. १२,०००/-, चिमाजी आप्पा रु. २५,०००/-, हुतात्मा स्मारक ताम तलाव उद्यान रु. ५३,०००/-, अशा प्रकारे उद्यान देखभाल खर्च महानगरपालिकेकडून दिला जातो. ठेक्यामधील अटी व शर्ती प्रमाणे देखभालीचे काम ठेकेदाराकडून केले जाते का? वास्तविक देखभालीवर किती खर्च होतो व महानगरपालिकेचा किती रकमेचा ठेका आहे, या बाबत लेखा परीक्षण व्हावे. यातून मोठा भ्रष्टाचार उघड होईल.