
● दलित पँथर जव्हार , मोखाडा तालुक्यात विविध ज्वलंत प्रश्न घेऊन उतरणार रस्त्यावर
जव्हार मोखाडा तालुक्यातील विविध प्रश्न आणि समस्यांबाबत तालुक्यातील नागरिकांनी , पँथरच्या कार्यकर्त्यांनी तसेच पत्रकार बंधूंनी जव्हार येथील संपर्क कार्यालय येथे पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांची प्रत्येक्ष भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सुपूर्त करण्यात आले. जव्हार व मोखाडा तालुक्यातील जनतेचे दैनंदिन जीवनातील अनेक जिव्हाळ्याचे व ज्वलंत प्रश्न निर्माण झाले असून , वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई लढण्यास आम्ही पँथर सोबत कटिबद्ध आहोत अशी ग्वाही जनतेच्या वतीने देण्यात आली. या प्रसंगी दलित पँथर शेवटच्या श्वासा प्रयंत जनतेच्या न्याय , हक्क , अधिकारासाठी वेळप्रसंगी लढा उभारून, न्याय मिळवून देई प्रयंत पँथर स्वस्थ बसणार नसून , शासनाला जाग आणण्यासाठी लवकरच आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असे वचन अविश राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले. यावेळी पालघर जिल्हा संघटक लहानु डोबा , पालघर जिल्हा उपाध्यक्ष वसीम काजी , पालघर जिल्हा महिला उपाध्यक्ष आशा गवई , मोखाडा तालुका अध्यक्ष ईश्वर धोंडगा , जव्हार तालुका अध्यक्ष देविदास दिघा , पालघर जिल्हा प्रमुख सल्लागार सदाशिव घारे , युवा पत्रकार वामन दिघा , कमलाकर माळी व सहकारी , पालघर तालुका महिला उपकार्याध्यक्ष शालिनी वानखेडे , पालघर तालुका प्रमुख सल्लागार गणेश राऊत तसेच पँथरचे जव्हार मोखाडा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.