
विरार (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव दिनाच्या निमित्ताने विरार पूर्व येथील कातकरीपाडा ठिकाणाचे नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराज नगर असे करण्यात आले. या प्रसंगी सर्व रहिवाश्यांनी नविन नावाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. या वेळी बहुजन समाज पार्टी चे पालघर जिल्हा प्रभारी प्रा. डी. एन खरे यांनी नाम फलकाचे अनावरण केले. मनोगत व्यक्त करताना ते असे म्हणाले की, कातकरी ही आदिवासी समाजातील मागास जात असून एखाद्या जातीने कोण्या रहिवासी ठिकाणाला ओळख देणे हे आदिवासी भावांचा अपमान करणे आहे. आमचे लोक अशिक्षित असल्याने त्यांचा रहिवाशी ठिकाणांना काही लोकांनी जातीवरून नावे ठेवलीत हे दुरदैव आहे. त्यामुळे बहुजन समाजाचा स्वाभिमान व अभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव दिनाच्या निमित्ताने विरार पूर्व येथील कातकरीपाडा या ठिकाणाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामकरण करण्यात आले. या वेळी रजब अली खान, नासीर शेख, संतोष चौबे, विकास मोहिते, परवेझ शेख, तुळशीराम पवार, रमेश यादव, गोविंद शेलर, चेतन भोईर, प्रेम अहिरे, विशाल तायडे, फिरोझ नदाफ, विशाल कान्हेकर, सुमित रुके, पारस जगताप, प्रफुल सोनवणे, जाहिर शेख इत्यादी गावकरी उपस्थित होते.

