
◆ शेकडो नागरिकांनी मोफत तपासण्या तसेच मोफत औषधांचे घेतले लाभ

प्रतिनिधी : देशभरात कोविड19 तसेच ओमायक्रॉनचे भयानक संकट देशावर असताना , कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भावाने गतवर्षी देशातील लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. नव्याने देशावर आलेल्या ओमायक्रॉनच्या संकटसमयी दलित पँथर पालघर जिल्हा व स्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आपला देश आपली जबाबदारी या एकमेव उद्देशाने व जनतेच्या मागणीनुसार मौजे माहीम, तालुका पालघर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज हॉल येथे पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांच्या जयंती निमित्ताने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर महाआरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाने मोफत तपासण्या तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. सदर आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य तज्ञ डॉ आशिष दुबे , DRx पन्नालाल मोर्या , यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेकडो नागरिकांच्या विविध मोफत तपासण्या तसेच नागरिकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमात पंचक्रोशीतील बहुजन समाजातील शेकडो नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून महाआरोग्य शिबिराचे लाभ घेतले. बौद्ध युवक मंडळ , माहीम आंबेडकर नगर व ग्रामस्थ तसेच दलित पँथर माहीम शाखेच्या विशेष सहकार्याने तसेच पालघर जिल्हा उपाध्यक्ष रोहित चौधरी , पालघर जिल्हा प्रमुख सल्लागार निलेश गायकवाड , पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत यांच्या अथक परिश्रमाने महाआरोग्य शिबीर साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत , पालघर जिल्हाध्यक्ष जगदीश राऊत , पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष पँथर बिंबेश जाधव , पालघर जिल्हा कोषाध्यक्ष भरत महाले , पालघर जिल्हा उपाध्यक्ष रोहित चौधरी , पालघर जिल्हा महासचिव तथा पालघर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पॅंथर संतोष कांबळे , पालघर जिल्हा सचिव तथा सह प्रसिद्धी प्रमुख शिवप्रसाद कांबळे , पालघर जिल्हा सहसचिव रमाकांत गायकवाड , पालघर जिल्हा महिला अध्यक्ष मोहिनी इJजाधव , पालघर जिल्हा महिला उपाध्यक्ष विद्याताई मोरे , स्नेहा जाधव ,पालघर जिल्हा महिला कार्याध्यक्ष मरिना रिबेलो , जिल्हा प्रमुख सल्लागार दिवाकर जाधव , वसई तालुका अध्यक्ष हरेश मोहिते , डहाणू तालुका उपाध्यक्ष जिभाऊ अहिरे ,डहाणू तालुका महासचिव प्रसन्ना जाधव ,पालघर तालुका उपाध्यक्ष अहमद खान , पालघर जिल्हा युवा कार्यकारणी विशाल मोहने , पालघर तालुका महिला उपकार्याध्यक्ष शालिनी वानखेडे , अर्चना वैद्य , बोईसर शहर अध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे , वाणगाव शहर उपाध्यक्ष गिरीधारी बिसवाल , सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सुकटे , दिपक मिस्कीटा, हर्षद गिरधोले, गौरव जाधव , सफाळे विभाग कार्यकारणी सुदाम सर्जेराव , सफाळे विभाग महिला कार्यकारनी आयु.संदेशा शिवगण, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.सदर कार्यक्रमात सॅनिटायझर , मास्क व सोशल डिस्टंसिंगचा योग्य वापर करून कार्यक्रम यशस्वी करण्यात आले.