

नालासोपारा (विनायक खर्डे)- छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त वसई विरार नालासोपारा शहरातील विविध सामाजिक संस्था व संघटना एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नालासोपारा (प.) येथील गेलक्सी हॉल येथे संपन्न झाली.
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पँथर रिपब्लिकन सेनेचे संजय गायकवाड यांनी वंदन करत व शशी अण्णा, शालेय शिक्षिका यांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राजश्री स्वालबन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गंगावने यांनी प्रथम उपस्थित सर्व संस्थाच्या पदाधिकाऱ्याचे स्वागत करत शिवरायांच्या विचारांचा प्रभाव जनमानसात रुजल्याने स्वराज्य निर्माण होऊ शकले. छत्रपतींचा वैचारिक वारसा डोळ्यासमोर ठेऊन स्वराज्यचे पुनर्निर्माण करणेबाबत आपण संकल्प घेतला पाहिजे. यासाठी सर्व संघटना आपापसातील हेवेदावे विसरून एकत्रित येणे अंत्यत गरजेचे आहे. प्रदीप गंगावने यांनी छोटेखानी भाषण करत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले व उपस्थिताची मन जिंकली. सहारा संगती या सामाजिक संस्थेच्या शशिकला यादव यांनी महाराजांची स्तुती करत आपल्या संस्थेमार्फत गरीब गरजु नागरिकानाआरोग्य सेवा पुरविण्याचे व पीडित रुग्णांची सेवा करण्याचे काम कशा पद्धतीने करतात यांबद्दल माहिती दिली.
या प्रसंगी लेखक गोविंद पिंपळगांवकर लिखित शिवरत्न जिवाजी महाले यांच्या पुस्तकाचे विद्याथ्यांना मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन पँथर रिपब्लिकन सेना, राजश्री स्वावलंबी संस्था, प्रजा सुराज्य पक्ष, स्वराज्य रक्षक संघ, अखिल भारतीय जिवा सेना, श्रृति निधी चॅरिटेबल ट्रस्ट, दि बुध्दिस्ट सोशियल फाऊंडेशन, मावळा जवान संघटना, प्रकाश चॅरिटेबल ट्रस्ट, सहारा संगती, वंचित बहुजन आघाडी, छत्रपति शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर, बामसेफ, स्वदान फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले.