
प्रतिनिधी :
पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील आगाशी मंडळ व आगाशी तलाठी हद्दीत आगाशी तलाठी कार्यालयासमोर विकासक मनोज प्रभाकर सांगळे व अन्य यांनी अवैधपणे माती उत्खनन करून पुरा पाडा येथे अवैध माती भराव केलेला आहे. सदर बाबत संबंधित तलाठी गुलाबचंद भोई यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई केली जात नसल्याबद्दल प्रशांत धोंडे यांनी तहसीलदार वसई यांच्याकडे तक्रार दिली आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील आगाशी मंडळ व आगाशी तलाठी हद्दीत आगाशी तलाठी कार्यालयासमोर विकासक मनोज प्रभाकर सांगळे व अन्य यांनी अवैधपणे माती उत्खनन करून पुरा पाडा येथे अवैध माती भराव केलेला आहे. सदर अवैध माती उत्खनन व भराव प्रकरणी प्रशांत धोंडे यांनी आगाशी तलाठी गुलाबचंद भोई यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. मात्र कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे तलाठी गुलाबचंद भोई यांचे सदर विकासकाशी आर्थिक हितसंबंध असल्याची शक्यता वर्तवित सदर प्रकरणी कारवाई करण्याची मागणी प्रशांत धोंडे यांनी केली आहे.
विकासकाने अवैध उत्खनन व भरणी करून शासनाचा महसूल बुडविला आहे. शासनाचे नुकसान करणाऱ्या विकासकाला तलाठी गुलाबचंद भोई पाठीशी घालण्याचे काम करीत असून याची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी.