
नालासोपारा, प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त नालासोपाऱ्यातील ऍड. किरण म्हात्रे यांच्या कार्यालयात कार्यक्रम संपन्न झाले. प्रमुख अतिथी म्हणून मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला पुष्पहार घालून व आरती ओवाळणीचे कार्यक्रम झाले. त्यानंतर श्री भोईर यांनी दोन शब्दात शिवाजी महाराजाची इतिहास रचनेवर आपले विचार मांडून सर्वाना धन्यवाद व्यक्त केले. या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव पालघर उप जिल्हा अध्यक्ष, गोडबोले तसेच ज्युपिटर पुब्लिकेशन कंपनीच्या एम.डी. व स्त्री दर्पणच्या संपादिका तेहसीन चिंचोलकर ही उपस्थित होत्या. पत्रकार प्रज्योत मोरे, व पी.एम. दुपारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.