
वसई ( प्रतिनिधी) : – होळी भाजी मार्केट हे शेतकरी साठी उपलब्ध करून दिले आहेत पण त्या मार्केट मध्ये काही भाजी वाले आपले गोडावून बनवून दिवस रात्र आपले भाजीचा माल तेथे साठवून ठेवण्यात येतो, त्यामुळे तेथे अनधिकृत पणे शेड ही उभारण्यात आले आहेत, काही होलसेल वाले व फेरीवाले तेथे झोपत ही असतात व तेथे काही गैरकृत ही चालतात. त्या मुळे शेतकरी यांना त्याचा खूप नाहक त्रास होत आहे, संध्याकाळी तेथे लाईट ही रात्र भर चालू असते ? का ? त्याचा बिल कोण भरणार ? आणि तेथे अनैतिक धंदे ही रात्री चालतात त्यामुळे तेथील कायद्या सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व कामासाठी येथील काही भाजीवाले यांनी महानगर पालिकेच्या काही मार्केट मधील अधिकाऱ्यांना हाताशी धरलेले आहेत असा नागरिकांचा संवशय आहे.
या सर्व बाबींचा विचार विनिमय करून आपण साहेब त्वरित यावर लक्ष वेधीत करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व ते संध्याकाळचे अतिक्रमण हटवण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे फिरोज खान, मा.उपाध्यक्ष, वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे महानगर पालिका मा. सह आयुक्त प्रभाग ” आय ” विभागाला केली आहे.