मुंबई( प्रतिनिधी) श्रम शक्तीला आपल्या देशात पूर्वीपासून महत्व आहे. अखिल विश्वाचा कारभार कामगारांच्या कष्टामुळे चालतो. कामगारांनी पाया रचला नाही तर कुठलीही इमारत उभी राहणार नाही. कामगारांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते व राष्ट्रनिर्माण कार्यात त्यांचे योगदान अनन्य साधारण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते धडक कामगार युनियनच्या वतीने देण्यात येणारे ‘कामगार मित्र’ पुरस्कार शुक्रवारी (दि. २५) राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजित राणे, श्रीमती अनघा राणे व पुरस्कार विजेते निमंत्रित उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते कामगार मित्र विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

कामगार चळवळीशी निगडित कार्यकर्ते व कामगारांसाठी काम करणारे वकील, पत्रकार व समाज सेवकांचा सत्कार घडवून आणल्याबद्दल धडक कामगार संघटनेचे अभिनंदन करताना राज्यपाल म्हणाले, कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. कामाला प्रतिष्ठा देऊन ते तन्मयतेने केले तर ते ईश्वरी आनंद देते. आज आपण प्रामाणिकपणे काम केले तर उद्या त्याचा फायदा भावी पिढीला होतो असे राज्यपालांनी सांगितले.

धडक कामगार युनियन गेल्या १० वर्षांपासून काम करीत असून आज संस्थेशी ७.३० लाख कामगार जोडले गेले असल्याचे अभिजित राणे यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍड सुभाष भुतिया, ऍड. आसिफ मुल्ला, मुल्ला ऍण्ड मुल्ला असोसिएट, आशिष पाटील, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका, ऍड. अशोक भाटिया वरिष्ठ वकील, ऍड. अरुण निंबाळकर वकील, हायकोर्ट मुंबई, ऍड. जय भाटिया, मॅनेजिंग ऍर्टनी, जे. के.बी लिगल, विजय शिर्के, संचालक, शिर्के ग्रुप, इर्शाद मुल्ला व्यवस्थापकीय संचालक, हाजी आदम मुल्ला, युनिव्हर्सल स्कूल, अशोक पवार, डेप्युटी आरटीओ, अंधेरी आणि बोरिवली, वेगुणपाल शेट्टी, हॉटेल साई पॅलेस उपाध्यक्ष, अमर पवार, व्यवस्थापकीय संचालक, लॅकोझी टोयोटो ऑटो प्रा. लि., राजेश विक्रांत, साहित्य संपादक: वृत्त मित्र, उदय पै, व्यवस्थापकीय संचालक, ऍड आर्ट, अतुल रावराणे, शिवसेना नेते सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य, दशरथ सिंग, एचआर मॅनेजर, पीव्हीआर सिनेमा, करण गायकर, संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतीवीर सेना, निलेश चांदोळे, मानव संसाधन व्यवस्थापन (एच आर) कार्निवल सिनेमाज, प्रकाश बारोट, सीईओ, झेनल कंन्सट्रकशन प्रा. लि., राजेश पुरंदरे, ज्येष्ठ पत्रकार, अमोल राणे, सीईओ, वास्ट मीडिया प्रा. ली., रामजस यादव, अध्यक्ष,धडक कामगार युनियन, ऍड. नारायण पणिकर (मुरली),उपाध्यक्ष, धडक कामगार युनियन, प्रकाश पवार, खजिनदार, धडक कामगार युनियन, झोहेब पटेल, संचालक, आदर्श मसाला अँड कंपनी
कुणाल जाधव, जनसंपर्क प्रमुख, धडक कामगार युनियन, मनीषा यादव, ऑफिस को- ओरडीनेटर, धडक कामगार युनियन, मुख्य कार्यालय, झुल्लुर यादव, अध्यक्ष- सेल्स टैक्स ऑफिस यूनिट, कमलेश वैष्णव, ब्यूरो चीफ, नेशन फस्ट टीवी चैनल, जॉनी वायके, महाराष्ट्र वन कर्मचारी युनिट अध्यक्ष धडक कामगार युनियन, विजय एस. सावंत (विजू पटेल) निर्माता-दिग्दर्शक- अभिनेता, कमलेश यादव, नगरसेवक, भाजपा, डॉ. अजित सावंत, बी.ए. एम. एस (बॉम्बे), सत्यविजय सावंत, युनिट अध्यक्ष, हसमुख अँड कम्पनी पीजीधडक कामगार युनियन, धीरज पाटील युनिट अध्यक्ष, हॉटेल पर्ल, धडक कामगार युनियन, उत्तम कुमार, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, धडक कामगार युनियन, अभिजित भोईटे, महाराष्ट्र उपाध्यक्ष, धडक कामगार युनियन, डॉ नारायण राठोड, बी के पांडे, कामगार मित्र पत्रकार यांना यावेळी कामगार मित्र पुरस्कार देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *