दिनांक 28फेब्रुवारी 2022 रोजी श्री प्रकाश गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक पालघर तथा प्रभारी पोलीस अधीक्षक पालघर याना गोपनीय सूत्रांकडून चहाडे ते तांदुळवाडी नाका बाजूकडे जाणारे रोडवर मौजे तांदुळवाडी गावचे हद्दीत ता. जि. पालघर येथे विना परवाना रेती वाहतूक व उत्खनन करीत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली।होती.
सदर माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक यांचे कार्यलयातील पोलीस स्टाफ व सफाळे पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी दिनांक 1मार्च 2022 रोजी रात्री 1:30 वा. चे सुमारास वरील नमूद ठिकाणी छापा टाकला असता 04 आरोपी हे आपसात संगनमत करून शासनाची परवानगी नसताना अनधिकृत पणे विना परवाना रेती गौन खनिज ट्रक मध्ये भरून चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आले आहेत सदर आरोपी कडून रेती ,रेती बोट ,ट्रक व लोखंडी सेक्शन पंप असे एकूण अंदाजे 41 लाख 40 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला,आरोपी विरुद्धात सफ़ाळा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *