वसई ( प्रतिनिधी) : वसई परिसरातील रेशनिंगचे धान्य येथील गरीब जनतेला वेळेवर मिळत नाही आहे, त्यामुळे गरीब जनतेचे हाल होत आहे, या बाबत वसई विरार शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीचे महिला उपाध्यक्षा श्रीमती शमीम फिरोज खान यांच्या कडे लोकांनी तक्रार केल्यानंतर याची विचारपूस केल्यावर असे कळाले की रेशनिंग दुकानात येणार धान्यसाठा हा बोरिवलीतुन पाठविण्यात येतो त्यामुळे हे धान्य वसईतील रेशनिंग दुकानांवर वेळेवर पोचत नाही म्हणून वसईतील रेशनिंग दुकानदारांना धान्य जनतेला वेळेवर दिले जात नाही याची दखल घेऊन वसई विरार शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी तर्फे दिनांक:- 02/03/2022 रोजी एक पत्र देऊन मा. तहसीदारांना विनंती केली आहे,
रेशनिंगचे धान्य बोरीवलीतून न मंगवता वसईतच उपलब्ध करून देण्यात यावे व गरीब जनतेला वेळेवर रेशन भेटेल याची काळजी घ्यावी, तसेच पुढे येणाऱ्या सणा-सुदीच्या काळात जनतेला तांदूळ आणि गहू बरोबर आणखीन खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्यात यावे जसे : डाळ, तेल, साखर वगैरे असे अनेक धान्य देण्यात यावे . रेशनिंग दुकानातील धान्य वाटप वेळी ऑनलाईन केल्यामुळे त्या ऑनलाईनचे नेकवर्क सेटर डाऊन असल्या कारणाने जनतेला दुकानदार रेशनिंग धान्य पुरवू शकत नाही त्यांना नेटवर्कचे सेटर ची वाट पाहावी लागते. असे काही समस्या मुळे वसईतील जनतेला रेशनिंग धान्य वेळेवर मिळत नाही.याची दखल घेऊन तहसीलदार कार्यलयातील पुरवठा विभाग प्रमुख यांनी योग्य तो निर्णय घेऊन येतील जनतेला सहकार्य करावे अशी मागणी शमीम खान यांनी पत्रात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *