● 97 हजार मतदारांवर टांगती

पालघर,प्रतिनिधी,दि.2 मार्च – मतदार यादीत मतदारांच्या नावासमोर समान फोटो असणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे 97 हजार मतदारांची पडताळणी सुरू आहे. मतदार यादीत एकच फोटो दुसऱ्या ठिकाणी आढळल्यास त्याची माहिती डिलीट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे बोगस नोंदी केलेल्याची आता खैर असणार नाही. मतदार यादी अपडेट करण्याचा हा दुसरा टप्पा आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यभरात विशेष मोहीमद्वारे फोटो नसणाऱ्या व दुबार नावे असणाऱ्या मतदारांची पडताळणी मध्ये पालघर जिल्ह्यात सव्वा लाख मतदारांची पडताळणी करून पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 80 हजार मतदारांची नावे वगळली होती. जानेवारी 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीतील संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 हजार 634 ने त्यामुळे कमी झाली.

पालघर जिल्ह्यात आजमितीस 20 लाख 13 हजार 744 मतदार संख्या आहे. त्यापैकी नालासोपारा विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक पाच लाख पाच हजार मतदार आहेत. वेगवेगळ्या मतदार नोंदणी यांच्यासमोर समान फोटो असणाऱ्या जिल्ह्यात 96 हजार 971 नोंद आहे. त्यापैकी सुमारे 31 हजार नोंदी एकट्या नालासोपारा विधानसभा मतदार संघातील आहेत. बोईसर विधानसभा क्षेत्रात 21 हजार पालघर व डहाणू विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येकी सुमारे साडेतेरा हजार मतदारांची पडताळणी होणार आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील मतदार संख्या कमी होण्याची शक्यता आहे. समान छायाचित्र असणाऱ्या मतदारांची पडताळणी केंद्रस्तरीय मतदान अधिकारी करणार आहे. ते अशा मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन पडताळणी करतील. त्याचबरोबर मतदार यादीत त्रुटी असल्यास फोटो सुधारणे, नावात बदल करणे किंवा नाव वगळण्याची मुभा त्यांच्याकडे राहणार आहे.

विधानसभा क्षेत्र मतदार संख्या समान फोटो
05.01.2022 मतदार संख्या
डहाणू 272727 13452
विक्रमगड 288983 7316
पालघर 276051 13401
बोईसर 354930 21010
नालासोपारा 505394 30790
वसई 315659 11002
एकूण 2013744 96971

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *