
विरार- प्रतिनिधी- सत्यवान तेटांबे यांजकडून,
प्रसिद्ध लेखक तथा मार्मिक चे कार्यकारी संपादक श्रीरंग दिनकर धारप यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी शांताराम पाटील चाळ, फुलपाडा रोड, गांधी चौक, विरार (पूर्व) येथे नुकतेच निधन झाले. गरिबीला कंटाळून त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. अखेरपर्यंत त्यांची तब्येत ठणठणीत होती. निधन समयी शिवसेनेचे नेते दिलीप पिंपळे, पुतण्या विवेक धारप, विनोद आयरे, नगर सेविका प्रतिभा पाटील, वर्तक, दवंडे, सरोदे, पाटील नागरिक उपस्थित होते. ते अतिशय निर्भीड पत्रकार, स्पष्टवक्ते आणि स्वाभीमानी होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांना सहवास लाभला. मार्मिकमध्ये प्रमोद नवलकर संपादक असताना ते कार्यकारी संपादक होते. एकदा त्यांना भेटायला संभाजी नगरचे सर्वेसर्वा शाखाप्रमुख चंद्रकांत खैरे भेटायला आले त्यांना शिवसेनाप्रमुखांची भेट हवी होती. त्यांनी बाळासाहेबांना फोन केला आणि चंद्रकांत खैरे यांची भेट घडवून आणली.
आमदार खैरे आमदार, खासदार आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री ही झाले. बिचारे श्रीरंग धारप मात्र गरिबीचे चटके सहन करीतच राहिले. अखेरपर्यंत ते ते स्वाभिमानी जीवन जगले कोणापुढेही त्यांनी कधीही हात पसरले नाहीत. शिवसेना प्रमुखांनी त्यांना 10% करिता अर्ज करावयास सांगितले परंतु त्यांच्याकडे त्याकरिता पैसे नव्हते म्हणून त्यांनी आयती आलेली संधी गमावली. मला अशा माणसाची मैत्री लाभली हे मी माझे भाग्यच समजतो. मार्मिक पासून ते त्यांच्या निधनापर्यंत आमच्या मैत्रीत कधीही खंड पडला नाही. मात्र कोरोना काळात वर्षभर त्यांना भेटता आले नाही व अंत्यदर्शनालाही जाता आले नाही. मी त्यांच्या फोनवर संपर्क साधला असता विनोद आयरे यांनी फोन उचलला व ते गेल्याची दुःखद बातमी सांगीतली म्हणून मी विरारला जावून विनोद आयरे यांना भेटून आलो. खरे तर श्री दिलीप पिंपळे आणि विनोद आयरे अशा काही मित्रांनी यांच्याकरिता काहीतरी करायला हवे असा विचार केला होता परंतू धारप मात्र कोणाच्याही उपकारात न राहता जगाचा निरोप घ्यायचा निर्णय पक्का केला होता ते अतिशय परोपकारी वृत्तीचे होते. ईश्वर ह्यांच्या आत्म्यास शांती देवो.