
प्रतिनिधी : वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांनी चक्क मयत व्यक्तीच्या नावे नोटीस बजावल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर बाब ही नजरचुकीने झाल्याची सारवासारव तहसीलदार करीत आहेत. तसेच सदर प्रकरणात शिला रॉबर्ट मिस्किटा यांचे नाव कसे आले ? शिला रॉबर्ट मिस्किटा कोण आहेत? सदर प्रकरणात घोळ घालण्याचे व शिला रॉबर्ट मिस्किटा यांचे नाव कुळ म्हणून घुसविले जाण्याचा कट असल्याचे समजते. सदर बाबत चौकशी व्हावी.
या बाबत अधिक माहिती अशी की, मा. तहसीलदार वसई यांच्या न्यायालयात महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये कुळ नोंद होणेकामी डॉमनिक डायगो मिस्किटा व इतर विरुद्ध रामनाथ गजानन साने व इतर अशा दावा असून सदर प्रकरणी दि. ३०/१२/२०२१ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. सदर प्रकरणी रामनाथ गजानन साने यांच्या नावे नोटीस काढण्यात आली ते रामनाथ गजानन साने हे मयत आहेत. मयताच्या नावे तहसीलदार उज्वला भगत यांनी नोटीस बजावली. सदरची बाब त्यांच्या लक्षात आणून दिली असता सदर इसम इसम नामे रामनाथ गजानन साने हे मयत असल्याबद्दल माहीत नसल्यामुळे ही चूक झाल्याचे तहसीलदार उज्वला भगत यांनी म्हटले आहे.
सदर प्रकरणात शिला रॉबर्ट मिस्किटा यांचे नाव कसे आले ? शिला रॉबर्ट मिस्किटा कोण आहेत? सदर प्रकरणात घोळ घालण्याचे व शिला रॉबर्ट मिस्किटा यांचे नाव कुळ म्हणून घुसविले जाण्याचा कट असल्याचे समजते. सदर बाबत चौकशी व्हावी. वसई तहसील कार्यालयात अत्यंत मनमानीपणे व अंदाधुंद कारभार चालत असून तहसीलदार उज्वला भगत यांच्या विषयी अनेक तक्रारी वरिष्ठांकडे गेलेल्या आहेत. मात्र प्रशासन तहसीलदार उज्वला भगत।यांना पाठीशी का घालत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.