
नालासोपारा : अ.भा. जिवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगांवकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांना वीर जिवाजी महालेंचे स्मारक प्रतापगडावर बांधण्याची जागा निश्चितीसाठी तातडीची बैठक बोलवावी अन्यथा ७ मार्च २०२२ ला एक दिवसीय उपोषण करणार असा इशारा शासनाला दिला होता. पण शासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने सोमवारी दि. ७ मार्च २२ रोजी आझाद मैदानात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण योजल्या प्रमाणे संपन्न झाले.
अखिल भारतीय जिवा सेना स्मारकासाठी गेली १९ वर्षे शासनाकडे पाठपुरावा करत आहे. “होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” हे वाक्य इतिहासात अजरामर झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांवरील वार जर वीर जिवाजी महालेनी परतून लावला नसता तर आज वेगळा इतिहास आपल्याला पाहायला मिळाला असता. त्याच वीर जिवाजी महालेंच्या स्मारकासाठी काही नतद्रष्ट विरोध करीत आहेत.
सदर उपोषणाला आखिल भारतीय जिवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगावकर, मुंबई अध्यक्ष संजय इंगळे, बाप फौंडेशनचे अध्यक्ष सुरेश लोखंडे, ऑल इंडिया फ़िल्म प्रोड्युसर अँड आर्टिस्ट युनियांचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कलिंगन, पँथर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष संजय गायकवाड, स्वराज्य रक्षक संघाचे अध्यक्ष विनायक खर्डे, पंकज महाले व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवून सहकार्य केले.