

नालासोपारा(राजेश जाधव)- पोलीस कुटुंब कल्याणकारी सामाजिक संस्था, रजनी विवाह चॅरिटेबल ट्रस्ट, आणि मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि .८ मार्च २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता जैन सभागृह,तुळिंज रोड , नालासोपारा पूर्व या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला.विशेष म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व महिलांचे स्वागत संस्थेच्या पुरुष पदाधिकारी महिलांवर पुष्पवृष्टी करून केले. तसेच मंचावर महिला डाॅ.कल्पना वारंग , अॅड.किरण म्हात्रे, शिक्षिका सुरेखा सोनावणे,स्त्री रोग तज्ञ डॉ.सोनाली महाजन ,तर समाजसेविका रजनी ताई गडा या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्या कामाबद्दल उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.या मान्यवर महिलांच्या हस्ते नारी शक्ती सन्मान पुरस्कार सोहळा समाजातील रिक्षा चालक महिला , महिला सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल युवाशक्ती एक्सप्रेसचे कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला आणि स्त्री दर्पण चे संपादिका तेहसीन चिंचोलकर यांना नारी शक्ती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच उपस्थित सर्व महिलांना नारी शक्ती सन्मान सहभाग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान रजनी विवाह चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा रजनी ताई गडा यांनी भूषविले तर सूत्रसंचालन मैत्री संस्थेच्या पालघर जिल्हा उपाध्यक्षा तेजस्विनी डोहाळे यांनी फार सुंदररित्या करून उपस्थितांची मने जिंकली.तर कार्यक्रमात बाल कलाकारांनी नृत्य सादर करुन उपस्थितांचे मनोरंजन केले.या कार्यक्रमात मैत्री संस्थेचे अध्यक्ष सूरज भोईर , महाराष्ट्र सचिव राजेश जाधव ,पालघर जि. कार्याध्यक्ष विजय गोडबोले , रजनी विवाह चॅरिटेबल ट्रस्ट चे प्रकाश गडा , सिने कलाकार सुभाष सिंग, कवी लेखक सुनील असोनकर, सल्लागार प्रज्योत मोरे,राजू लोखंडे, पांडुरंग कोल्हे ,गडियाल हे विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.