

प्रतिनिधि: ८ मार्च जागतिक महिला दिन सर्व ठिकाणी उत्साहात साजरा हाेत असताना वसई तालुक्यातील गौतम नगर निर्मळ गावात सुध्दा सूंदर रितीने साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन तथा संपूर्ण नियोजन गौतम नगर गास (निर्मळ) रहिवासी संघ महिला मंडळ तर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतल्यास पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्रातील थोर महामाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर कार्यक्रमाची प्रस्तावना शुभांगी अनंत चव्हाण यानी प्रस्तावित केली. कार्यकर्माचे सूत्रसंचालन सोनल मंगेश मोहिते व रंजना राकेश चव्हाण यानी केले. कार्यक्रमामधे अनेक मान्यवर ऊपस्थित होते.भारतीय बौध्द महासभा मिरा-भाईंदर शाखा महिला ऊपाध्यक्ष : विद्याताई थोटे, डॉ. ज्योती ढाकरके, नाळा आंबेडकर नगर येथील दिप्ती चेतन भोईर, आशा वर्कर : मनिषा भोईर, आंबेडकर नगर भुईगाव डोंगरी येथील कामीनी महेश जाधव, नयना सन्नी डिसोजा असे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष द्वौपती चंद्रकांत चव्हान यांना देण्यात आले होते. आलेल्या मान्यवरानी व कार्यमाचे अध्यक्षा यांनी महिला दिनाचे महत्व पटवुन महिलाचे हक्क अधिकार काय यांचे महत्त्व पटवून दिले अनेक मान्यवरानी समाजातील चाललेल्या महिला विषयी घडामोडी व आताच्या महिला कशा प्रकारे प्रगति पथावर जात आहेत आणि समाजात सुरु असलेल्या अंधश्रद्धा रूढी परंपरा या बाबत सुध्दा भाष करण्यात आले. अंधश्रध्दा व हुंडा प्रथा अजुन पर्यंत महाराष्ट्र सुरु आहेत हे सर्व लवकारत लवकर बंद असे न बोलता बंदच झाले पहिजेत असे आक्रमक भाषण आलेल्या मान्यवरानी केले अनेक विषय छेडण्याचा प्रयत्न केला. आरोग्य विषयावर समाजकारणावर अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली त्याच प्रमाणे कार्यक्रम नीयोजन केलेल्या गौतम नगर मधील महिल्याचे कौतुक सुध्दा करण्यात आले गौतम नगर मधील जागृति हाडळ, पूजा हडळ यांनी उत्कृष्ट रांगोली काढली होती त्यांना सुध्दा शुभेच्छा देण्यात आल्या गावातील महिला कार्यकर्त्यां प्रगती हरेश मोहिते व दिपा मनोज मोहिते यांनी महिला विषयी उत्कृष्ट भाषण केले लहान मुलानी सांस्कुतिक कार्यक्रम सुध्दा केले. कार्यक्रमात शाररीक व आर्थिक मदत दिलेल्यांचे सर्वांचे आभार व गुच्छ देउन स्वागत करण्यात आले शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा द्वौपती चव्हाण यांनी सुध्दा गावतील महिलांना प्रेरणा दाई भाष्य केले तुम्ही सर्व महिला शिकलेल्या आहेत गावच्या कामासाठी तुमचा चांगला उपयोग होणार आहे आमचे शिक्षण कमी होते पण आम्ही गावासाठी त्यावेळेस चांगले कार्य केले तुम्ही सुध्दा करा अशा अनेक विषयांवर अध्यक्षा यांनी भाष्य केले. आभार गौतम नगर ची सहखजिनदार आश्विनी निलेश मोहीते यांनी मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले