
नालासोपारा: युवराज संभाजी महाराजांच्या ३३३ व्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवार दि.११ मार्च २०२२ रोजी सकाळी ७.०० वाजता, जिल्हा परिषद शाळा सोपारा , समेळपाडा, गुजराथी शाळेसमोर, नालासोपारा (प.)
अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अभिवादन कार्यक्रमला रजनी विवाह मंडळ चे रजनी गडा, प्रकाश गडा, राजश्री स्वावलंबी संस्थेचे अध्यक्ष प्रदिप गंगावणे, जिवा सेनेचे अध्यक्ष गोविंद पिंपळगावकर व पंकज महाले हजर होते.
रोजच्या धावपळीच्या जीवनात सकाळचा कार्यक्रम असूनही रजनी मॅडम यांनी प्रथम हजर राहत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ स्वच्छता करून संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत राज्यांना मानवंदना दिली. प्रदीप गंगावणे यांनी संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत उपस्थिताचे आभार मानले व संभाजी महाराजांबद्दल भरभरून बोलताना शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्य खऱ्या अर्थाने अटकेपार नेण्याचे काम संभाजी महाराजांनी केले. हे राष्ट्रपुरुष विशिष्ट जात धर्म ,राष्ट्र, प्रांत यांच्याशी मर्यादित नसुन समस्त मानव जातीच्या कल्याणकारी विचार करणारे होते. आपण कोणत्याही संघटन, संस्था, पक्षाचे असा कोणत्याही क्षेत्रात असा आपला एकच उद्देश आहे ती म्हणजे महाराजांची संकल्पना जी अखंड स्वराज्य निर्माण करणं जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारित असलं पाहिजे जी संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन अखंड स्वराज्य निर्माण केले तीच संकल्पना देश निर्माण आणि राष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय गाठू शकतो.
रजनी गडा मॅडम यांनी शंभू राजाच्या मृत्यू समयी औरंगजेबानी केलेल्या अमानुष कृत्याच्या आठवणी जाग्या करून वातावरण भावनिक करून टाकले. एक खंत मॅडमनी व्यक्त केली की आजच्या शालेय विद्यार्थ्यांना याविषयी काहीच माहिती नाही. जे खरंच ऐतिहासिक हिरो आहेत त्याच्या विषयी माहिती न ठेवता फिल्मी हिरोची खडानखडा माहिती ठेवतात. आज ज्यांनी राष्ट्र कार्याला स्वतःला वाहून दिले त्याचे परिवार, वंशज ज्या परिस्थिती जीवन कंठत आहेत त्यांची दखल शासनाने घेण्यास भाग पाडणे हे आपलं आद्य कर्तव्य असले पाहिजे.
अभिवादनाचा कार्यक्रम सर्वं उपस्थितांचे आभार मानत आयोजन करते स्वराज्य रक्षक संघाचे अध्यक्ष विनायक खर्डे यांनी संपूर्ण वसई तालुक्यात शंभू राज्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजन सलग दुसऱ्या वर्षी करत असल्याने प्रजोत मोरे यांनी पुढील वाटचाळीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.