
दि. ११: वसई पूर्वेतील रेंज ऑफिस पासून राष्ट्रीय महामार्गावरील वसई फाटा उड्डाणपुलापर्यंत रस्ता दुभाजकाच्या मध्यभागी नवीन पथदिवे व स्ट्रीट लाईट लावणे अत्यंत आवश्यक आहे. रेंज ऑफिस पासून वसई फाटा पर्यंतचा हा रस्ता राष्ट्रे महामार्गाला जोडला जात असून या रस्त्यावरून अनेक जड वाहने, चारचाकी, तीनचाकी प्रवासी व खाजगी वाहने, दुचाकी वाहनांची वर्दळ नेहमी असते. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात कारखाने व कंपन्या असल्याने नागरिकांची वर्दळ सुरू असते. रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याकारणाने ह्या मार्गावर जाणाऱ्या वाहन चालकांना रस्ता दिसत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहे. तसेच दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. या रस्त्यावर लवकरात लवकर पथदिवे लावून भविष्यात होणाऱ्या अपघातांना आळा घालावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपचे वसई पूर्व मंडळाचे अध्यक्ष अश्विन सावरकर यांनी वसई विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.