
पालघर दि 15 : नाविन्यपूर्ण योजना सन 2021-22 अंतर्गत पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परिक्षांतील सहभाग वाढविण्याच्या दृष्टिने जिल्हा नियोजन समिती पालघर, कार्यालयामार्फत आशादिप अध्यापक महाविद्यालय, तुळींज, नालासोपारा (पु.) येथे स्पर्धा परिक्षांविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळालाअसून कार्यशाळेस साधारणत: 300 विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. स्पर्धा परिक्षांविषयक मार्गदर्शक पुस्तीकेचे उपस्थितांना वितरण करण्यात आले. अशाच प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन प्रत्येक तालुक्यात करण्यात येणार असून सदर कार्यशाळांतून स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे . पुढील कार्यशाळेचे आयोजन गुरुवार दि. 17 मार्च,2022 रोजी बोईसर येथे केले आहे.
पालघर जिल्ह्यातील विद्ययार्थ्यांनी सदर कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शन घ्यावे, असे अवाहन जिल्हा नियोजन अधिकारी . सचिन माघाडे यांनी केले आहे.