प्रतिनिधी: गौतम नगर( निर्मळ) व आंबेडकर नगर नाळा गावात फल्गुन पोर्णिमेचा औचित्य साधून वसई पश्चिम किणारपट्टीतील स्थानिक भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वसई तालुक्यात पश्चिम किणारपट्टीत वसलेली आठ ते नऊ गावे आहेत त्यांची भाषा लोप पावत चाललेली दिसुन येत असल्यामुळे कार्यकत्यांच्या संकल्पनेतून पोर्णिमेच्या माध्यमातुन सदर कार्यक्रम संपन्न झाला. फाल्गुन पोर्णिमेचा कार्यक्रम गौतम नगर निर्मळ गावातील कार्यकर्ते नितिन जनू मोहिते यांच्या रहत्या घरी कार्यक्रम घेण्यात आला होता सुरूवातीस महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करून बौद्ध विधि घेऊन आलेले पाहुणे मंडळी व भीम प्रेरणा जागृती संस्था व भारतीय बौद्ध महासभा वसई पश्चिम शाखेचे पधाधिकारी व पाहुणे मंडळी यांचे पूष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सुत्रसंचालन शुभांगी अनंत चव्हान यांनी केले आलेल्या मान्यवरांचे मानसन्मानानी स्वागत करण्यात आले मान्यवरांनी पोर्णीमेचे व स्थानिक भाषेचे महत्व पटवुन दिले अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. लहान मुलानी, तरूणांनी, महिलांनी सुध्दा आपले विचार मांडले. त्याचप्रमाणे आंबेडकर नगर नाळा गावातील कार्यकर्ते भिम प्रेरणा जागृती संस्थेचे अध्यक्ष यांनी सुध्दा आपल्या राहत्या घरी सदर कार्यक्रम घेण्यात आला. तेथे सुध्दा फाल्गुन पोर्णिमा व भाषविषयी चर्चा करण्यात आली. स्थानिक भाषेविषयी गाणे कशा प्रकारे होती कशा प्रकारे गायली जात होती हे सर्व वरिष्ठ कार्यकर्त्यानी पटवुन दिले कार्यक्रमात भिम प्रेरणा जागृती संस्थेचे अध्यक्ष अँड. चेतन भोईर, गौतम नगर चे संस्थापक कृष्णजी चव्हाण, भारतीय बौध्द महासभा वसई पश्चिम शाखेचे अध्यक्ष मंगेश क.मोहीते, सेक्रेटरी महेश ब. जाधव, चंद्रकांत स.चव्हाण, किरण जाधव, पत्रकार हरेश गणपत मोहिते, आंबेडकर नगर, नाळा येथील अध्यक्ष भुपेंद्र भोईर, नितीन भोईर, निलेश भोईर,दीप्ती भोईर,प्रशांत भोईरअसे अनेक मान्यवर ऊपस्थित होते.गौतम नगर मधील नितीन मोहीते व आंबेडकर नगर नाळा गावातील अँड.चेतन भोईर यांनी त्यांच्या घरी कार्यक्रम घेऊन लोकांपर्यंत चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला. सदर कार्यक्रमात भोजनाची व्यवस्था ही केली होती. समस्त ग्रामस्थानी त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *