
वसई( प्रतिनिधी) :- वसईतील तहसीलदार कार्यलयातुन जनतेला मिळणारे रेशनकार्ड वेळेवर मिळत नसल्याने लोकांचे अतोनात हाल होत आहे. अर्ज करून वर्षनू वर्ष रेशनकार्ड मिळत नसल्याचे दिसून येत आहे. लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत जेष्ठ नागरिकांनाही रेशनकार्ड वेळेवर मिळत नाही व त्यांना तहसीलदार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. तरी मा. तहसीलदार, उज्वला भगत मॅडमनी यात जातीने लक्ष दिले पाहिजे तसेच वसईतील क्रीतेक जनतेला अजून इलेक्शन कार्ड मिळालेले नाही या बाबत ही मा. तहसीलदार मॅडम नी लक्ष दिले पाहिजे कारण पुढे येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणूकी मध्ये लोकांना इलेक्शन कार्डची आवश्यकता असते. नवीन इलेक्शन कार्ड धारक ही इलेक्शन कार्ड मिळणे कामी तहसीलदार कार्यलयाच्या फेऱ्या मारताना दिसून येतात.
म्हणून लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी लवकरात लवकर रेशनकार्ड व इलेक्शन कार्ड लोकांना उपलब्ध करून देण्याची मांगणी यंग स्टार शेसल फाउंडेशन चे अध्यक्ष मा. आसिफ नासीर शेख यांनी दिनांक :- ,21/03/2022 रोजी एक लेखी पत्र देऊन केली आहे.