युवाशक्ती एक्सप्रेस चे संपादक तुषार गायकवाड काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.ना.आ. नाना पटोले साहेब यांना पुष्पहार देताना छाया चित्रात दिसत आहे
बहुजन महापार्टी चे राष्ट्रीय महासचिव शंमसुद्दीन खान हे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले साहेबांशी चर्चा करताना छायाचित्रात दिसत आहे…

मुंबई (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी १२ एप्रिलला मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याने या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून राजकारण करणाऱ्या भाजपा पक्षाला दूर ठेवणे गरजेचे असल्याने बहुजन महापार्टीने या निवडणुकीत उमेदवार उभा न करण्याचे ठरविले आहे. तसेच या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचे बहुजन महापार्टीने ठरविले आहे.त्याआनुषंगाने बहुजन महापार्टीचे राष्ट्रीय महासचिव शमसुद्दीन खान यांनी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. नाना पटोले यांचे निवास स्थानी भेट घेऊन बहुजन महापार्टीचा पाठिंबा पत्र दिले व केंद्र सरकार महाराष्ट्राच्या विकासाकडे कशाप्रकारे दुर्लक्ष करीत आहे व राज्याच्या हक्काचे जिएसटी ची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे याबाबत चर्चा झाली. पोटनिवडणुकीत कॉग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी बहुजन महापार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री. शहाजहान पैगंबर शेख व कोल्हापूर येथील स्थानिक कार्यकर्ते यांना याबाबत सूचना देण्यात आले आहे असे शमसुद्दीन खान यांनी नाना पटोले यांना सांगितले आहे. सदरचे पत्र देतेवेळी युवाशक्ती एक्सप्रेस चे संपादक तुषार गायकवाड, पालघर जिल्हाध्यक्ष श्री.परेश घाटाळ ,बंजारा सेनेचे राम राठोड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *