
प्रतिनिधी :वसई तालुक्यातील मुंबई महामार्गानजीक बाफाने येथील यदुवंशी ढाब्याच्या मागे तिवरांची झाडे तोडून मोठ्या प्रमाणात अवैध भराव करून अनधिकृत बांधकामे चालू करण्यात आलेली आहेत. सदर प्रकरणी कारवाई व्हावी.याबाबतची अधिक माहिती अशी की, पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील नायगांव पूर्वेस महामार्गा नजीक बाफाने येथे यदुवंशी ढाब्याच्या मागे तिवरांची झाडे तोडून अवैध माती भराव करून अनधिकृत बांधकामे चालू आहेत. भुमाफियांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मैनेज केल्याशिवाय तिवरांची झाडे तोडून अवैध माती भराव करून बांधकामे सुरू केलेली नाहीत. कोणतेही गैरकृत्य करण्यापूर्वी भूमाफिया संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रसाद चढवितात. यदुवंशी ढाब्याच्या मागे तिवरांची झाडे तोडून अवैध माती भराव व अनधिकृत बांधकामे करण्यापूर्वी भूमाफियांनी ठरल्याप्रमाणे मालपाणी पोहोचविला आहे. मंत्रालयापर्यंत लाचेची रक्कम पोहोचविली जाते. महा भयंकर भ्रष्टाचार चालू आहे.सदर प्रकरणी महसूल विभागाने त्वरित कारवाई करावी.